आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूआधी बहिणीने भावाला पाठवला होता व्हॉट्सअॅप मेसेज, लिहिले होते- डिलीट करू नकाे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेहाने भावाशी केलेल्या चॅटिंगचा स्क्रीनशॉट. - Divya Marathi
नेहाने भावाशी केलेल्या चॅटिंगचा स्क्रीनशॉट.

भागलपूर - येथील संप्रीति अपार्टमेंटमध्ये फ्लॅट नंबर 101 मध्ये झालेल्या नेहाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा पती दिनेश आझादला मंगळवारी कोर्टापुढे हजर केले. येथून त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली. पोलिस व्हॉट्सअॅप मेसेज आणि ब्रेड ऑम्लेटच्या फोटोला पुरावा बनवणार आहेत. 18 नोव्हेंबर रोजी नेहाने आपल्या भावाला व्हॉट्सअॅप मेसेज केला होता, यात काही चॅटिंग झाली होती. ती म्हणाली होती- हे मेसेज डिलीट करू नकोस.

 
पोलिसांनी मागितला व्हॉट्सअॅप मेसेजचा स्क्रीनशॉट
- याप्रकरणी नेहाचे वडील कैलाश रजक यांच्या तक्रारीवरून पोलिसांत हुंड्यासाठी हत्या केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
- एफआयआरमध्ये दिनेशशिवाय नेहाचे जेठ मनोज कुमार आझाद, जेठानी ज्युली आझाद यांना आरोपी करण्यात आले आहे. आरोपी जेठ-जेठानी यांना अजून अटक झालेली नाही.
- दिनेश आझाद एलआयसीच्या भागलपूर डिव्हिजनमध्ये सीओ आहेत. तर त्यांचा मोठा भाऊ मनोज आझाद याच ऑफिसमध्ये हायर ग्रेड असिस्टंट आहे.
 
- पोलिस सू्त्रांनुसार, 18 नोव्हेंबरला नेहाने आपली बहीण आणि भावाला व्हॉट्सअॅपवर पतीच्या बाबत अनेक मेसेज केले होते. मेसेजमध्ये नेहाने लिहिले होते की, दिनेश कसा तिला ब्रेड-ऑम्लेटमध्ये औषध मिसळून खायला लावतो.
- औषध मिसळलेल्या ब्रेड-ऑम्लेटचा फोटोही तिने व्हॉट्सअॅपवर भाऊ-बहिणीला शेअर केला होता. मेसेजशी संबंधित स्क्रीनशॉट पोलिसांनी पीडित कुटुंबाला मागितले आहे, जेणेकरून अधिक तपास करून सर्व मेसेज शोधता येतील.

 

नेहाने भावाला केला होता हा मेसेज
- पोलिस सूत्रांनुसार, 18 नोव्हेंबर रोजी व्हॉट्सअॅपवर नेहाचे तिच्या भावाशी व बहिणीशी बोलणे झाले. नेहाने लिहिले होते की, ब्रेड-ऑम्लेटमध्ये पती औषध मिसळून खाऊ घालतो, जेणेकरून मी आई बनू नये.
- औषध मिसळून तयार केलेल्या ब्रेड ऑम्लेटचे फोटो नेहाने आपल्या भावाला व्हॉट्सअॅप केले होते. नेहाने फोटो पाठवून असेही लिहिले होते की, याची कुठेच चर्चा करू नका आणि फोटो-मेसेजही डिलीट करू नका.
- नेहाला काहीतरी अघटित होणार असल्याचा आभास झाला होता. यामुळे तिने हे फोटो व मेसेज डिलीट न करण्याविषयी भावला सांगितले.

 

अशी झाली होती हत्या...

एलआयसी अधिकारी असलेल्या दिनेशने आपल्या पत्नीला विजेचा शॉक देऊन तिची हत्या केली. मृत नेहाच्या चेहऱ्यावर, गळ्यावर आणि हातांवर जखमांच्या खुणा होते. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून आरोपी पतीला ताब्यात घेतले.


हत्येनंतर मासे घेण्यासाठी निघाला, दोन तासांनी परतला...
एलआयसीच्या भागलपूर विभागातील ऑफिसचे सीईओ दिनेश रजक आणि त्याची 24 वर्षाची पत्नी नेहा संप्रीति आपार्टमेंटमध्ये राहत होते. पोलिसांनी सांगितले की, सुरूवातीला केलेल्या चौकशीत दिनेशने मनाने खोटी कथा रचून पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न केला. हत्येला अपघात बनवण्यासाठी त्याने पूर्ण प्रयत्न केले. दिनेश पत्नीची हत्या करून रविवारी सकाळी साडे 9 वाजता मासे आणण्यासाठी निघून गेला. दोन तासांनी साडे 11 वाजता घरी परतला, त्याने दरवाजाही वाजवला. दरवाजा उघडला नाही. त्यामुळे पत्नी औषधी घेऊन झोपली असेल असे सांगत त्याने पाच तास दरवाजा उघडण्याची वाट देखील पाहिली.


संध्याकाळी 4:45 वाजता तोडला दरवाजा....
मार्केटमधून खरेदी करून आल्यानंतर आरोपी दिनेश पाच तास घराबाहेरच फिरत होता असे सांगण्यात येत आहे. या दरम्यान त्याने सासरी फोन करून दरवाजा बंद असल्याचे सांगितले. त्यानंतर एक जवळच राहणारा साला घरी पोहोचला आणि संध्याकाळी 4:45 वाजता दोघांनी मिळून घराचा दरवाजा तोडला, तेव्हा आत नेहाचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी मिळालेले पुरावे आणि मृत नेहाच्या माहेरच्यांनी केलेल्या आरोपांवरून पती दिनेश रजकला पोलिसांना ताब्यात घेतले आहे.


अडीच वर्षापूर्वी झाले लग्न, कुरूप म्हणून हिणवत होता पती...
नेहाचे वडील कैलाश रजक यांनी सांगितले की, त्यांची मुलगी लग्नानंतर टीएनबी कॉलेजमथून पीजी करत होते. आडीच वर्षांपूर्वी तिचे लग्न दिनेशशी झाले. मुलीच्या मृत्यूची बातमी कळताच, कुटुंबीय भागलपूरला आले. नेहाच्या वडिलांनी जावाई त्याची भावजई आणि भावावर तीन गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, नेहाच्या सासरचे हुंड्यावरून तिचा छळ करत होते. नेहाला सतत त्रास देण्यात येत होता. तिला कुरूप म्हणूनदेखील जावाई दिनेश हिणवत होता. एवढेच नाही तर त्याचे आपल्या भावजईच्या बहिणीसोबत अनैतिक संबंध होते आणि यामुळे त्याने नेहाची हत्या केली, असा आरोपदेखील नेहाच्या वडिलांनी केला.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या प्रकरणाशी संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...