आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्याचे जडले भाच्यावर प्रेम, पण पंचायतीने एक फर्मान काढले अन् घडले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भागलपूर- येथे एका गावात पंचायतीत निर्णय घेऊन हिमाशु नावाच्या तरूणाची हत्या केली होती. बिहार मानवधिकार आयोगाने या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. गेल्या वर्षी पाच जूनला तरूणीच्या घरच्यांनी हिमाशु नावाच्या युवकाची हत्या केली होती. हिमांशु आणि नात्याने आत्या असलेल्या तरूणींचे एकमांकांवर प्रेम जडले होते आणि ते पळून जाऊन लग्न करणार होते असे सांगण्यात येत आहे. यानंतर गावात पंचायत बोलवण्यात आली होती, याच पंचायतीने हिमांशुच्या हत्येचे फरमान सुनावले होते.


या केससी निगडीत आरोपी अझब लाल यादव ची मुलगी अनुष्ठाने मानवाधिकार आयोगाला पत्र लिहून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. यावरून आयोगाने अहवाल मागवला आहे. महिलेच्या पत्राच्या चौकशीसाठी एसएसपी सीटी डीएसपीला अधिकृत केले आहे.


हत्यानंतर गायब आहे हिमांशुची पत्नी...
चौकशी अहवालात एकुन 21 आरोपींविरोधात ही केस सत्य असल्याचे आढळले आहे. यात अजब, लाल यादव यांचा देखील समावेश आहे. अजब लाल याने कोर्टात सरेंडर केले होते. हिमांशुच्या हत्येनंतर त्याची पत्नी गायब आहे. हिमांशुच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, सोनीच्या माहेरच्यांनी तिची हत्या केली आणि मृतदेह गायब केला. पोलिसांनी तेखील शोध घेतला पण तिचा काहीच पत्ता लगाला नाही. हे प्रकरण ऑनर किलिंगच्या दिशेने झुकताना दिसत आहे.

 

या आरोपीं विरोधात पुरावे....
हिमांशुची आई जेलस देवी यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात परमानंद यादव, सुनील यादव, भितो यादव, सुमन यादव, सीताराम यादव, विवेक यादव, प्रकाश यादव उर्फ पक्की, पूसो यादव, राजा यादव, पंकज यादव, प्रकाश यादव, अधिक यादव, प्रताप यादव, विजय यादव, अजब लाल यादव, गणेश यादव, वरुण यादव, सुमन यादव, अरुण यादव, कुशी यादव, गोपाल यादव हे दोषी आढळले आहेत. चौकशीत सर्व आरोपींवर कट रचून हिमांशुची हत्या करणे आणि त्याची पत्नी सोनीला गायब करण्याच्या आरोपात सत्यता आढळली आहे.


नात्यात लग्न करण्याच्या कारणावरून घेतली पंचायत...
हिमांशु यादवचे नात्याने आत्या असलेल्या सोनी कुमारीसोबत अफेअर सुरू होते. दोघेही घरातून निघून गेले होते. या प्रकरणी हिमांशुविरोधात सोनीचे वडिल परमानंद यादव यांनी अपहरणाचा केस दाखल केली. यात हिमांशु  व्यतिरिक्त त्याच्या कुटुंबातील अन्य लोकांचे नाव देखिल अरोपी म्हणून जोडण्यात आले होते. एप्रिल 2017 मध्ये हिमांशु आणि सोनी परत आले. त्यानंतर सोनी हिमांशुसोबत त्याच्या घरी राहु लागली. दोघांनी एकमेकांच्या सहमतीने लग्न केले होते. नात्यात लग्न करणे सोनीच्या वडिलांना आवडले नाही. यावरून पंचायत बोलवण्यात आली. या पंचायतीने हिमांशुच्या हत्येचे फर्मान सुनावले. यानंतर लोकांनी लाठ्या-काठ्या, गोळी-पिस्तोल घेऊन हिमांशुच्या घरावर हल्ला केला.


पुढील स्लाइडरवर पाहा संबंधित फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...