आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरा - येथे इजरी-पिपरा गावात सोमवारी रात्री एका विवाहितेला जिवंत जाळून हत्या करण्यात आली. मंगळवारी सकाळी पोलिसांनी खोलीतून विवाहितेचा मृतदेह हस्तगत केला. यादरम्यान, हत्येच्या घटनेने आक्रोशित होऊन मृत विवाहितेच्या माहेरच्यांनी दवाखान्यात खूप गोंधळ घातला.
> दरम्यान, मृतदेहासोबत आलेल्या सासरच्या मंडळीतील एकाला बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवून सर्वांना शांत केले. घटनेबद्दल मृत विवाहितेचे काका मुन्द्रिका राम यांनी संबंधित पोलिस स्टेशनमध्ये केस दाखल केली आहे. यात पतीसहित सासू आणि सासऱ्यांना आरोपी बनवण्यात आले आहे. तथापि, सासरची मंडळी विवाहितेच्या मृत्यूला आत्महत्याच म्हणत आहेत. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम सरकारी रुग्णालयात करण्यात आले. मृत इंदू देवी (25 वर्षे) इजरी-पिपराचे रहिवासी अमरजित पासवानची पत्नी होती.
लग्नानंतर झाला एक मुलगा अन् एक मुलगी...
सूत्रांनुसार, अलीपुर गावातील आरपीएफ जवान रामधारी राम यांची मुलगी इंदु देवीचे लग्न मार्च 2011 मध्ये इजरी-पिपराचे रहिवासी रिटायर्ड सीआयएसएफ जवान शाहदेव पासवान यांचा एकुलता एक मुलगा अमरजीत पासवानसोबत झाले होते. लग्नानंतर त्यांना एक मुलगा आणि एक मुलगीही झाली.
मृत इंदूदेवीच्या काकांचा आरोप आहे की, लग्नानंतर हुंड्यात पैसे आणि बुलेट मोटारसायकलसाठी इंदूचा छळ केला जात होता. पतीची मागणी पूर्ण न झाल्याने सोमवारी रात्री इंदूच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळण्यात आले. गंभीर भाजल्याने तिचा मृत्यू झाला. नंतर पतीने कळवल्यावर माहेरच्यांना याची माहिती मिळाली. ते सांगतात की, इंदूने आत्महत्या केली आहे.
वर्षभरापासून पति-पत्नीत होता बेबनाव, इंदूने पतीच्या डोक्यात मारला होता मुसळ
> सू्त्रांनुसार, पति-पत्नीत वर्षभरापासून बेबनाव सुरू होता. सासरचे म्हणाले, एका वर्षापूर्वी इंदूने लोखंडी मुसळाने पतीच्या डोक्यावर प्रहार करून त्याला जखमीही केले होते. बऱ्याच दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते.
> दुसरीकडे, मृत इंदूचा भाऊ सुनील म्हणाला की, छठ पूजेच्या वेळी बहिणीला माहेरी आणायला करायला गावात गेलो होतो. पण त्यांनी पाठवायला नकार दिला, ते हुंड्यात बुलेट मोटारसायकल आणि पैसे मागत होते.
काय म्हणतात पोलिस?
> पोलिस स्टेशन इंचार्ज सचिन देव म्हणाले की, मृत विवाहितेच्या काकाच्या तक्रारीवरून, पती, सासू व सासऱ्यावर हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
> इंदूच्या मृत्यूची बातमी कळल्याने माहेरच्यांनी प्रचंड आक्रोश केला. त्यांनी न्यायाची मागणी केली आहे.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संंबंधित आणखी फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.