आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लीम तरुणाने निभावली मैत्री.. अनाथ हिंदु मित्रावर केले विधीवत अंत्य संस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धमान - पश्चिम बंगालमध्ये रबी शेख नावाच्या एका मुस्लीम तरुणाने मैत्रीचा एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. रबीचा जिवलग मित्र मिलन दास याचा गेल्या महिन्यात मृत्यू झाला होता. मिलनच्या कुटुंबात दुसरे कोणीही नव्हते. त्यामुळे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कोण करणार याची चिंता त्याच्या शेजाऱ्यांना वाटू लागली होती. अशा परिस्थितीत मिलनचा जिवलग मित्र असलेल्या रबीने त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर, मुस्लीम असूनही त्याने हिंदु पद्धतीने विधिवत अंत्यसंस्कार केले. 


- हे प्रकरण वर्धमान येथील आहे. येथील मिलन याचा 29 मे 2018 रोजी मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबाबत काहीही माहिती न मिळाल्याने पोलिसांनी अनाथ म्हणून त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. 
- पण मिलनचा मित्र रबीला पोलिसांचा हा निर्णय मान्य नव्हता. त्यासाठी त्याने हिंदु मित्राच्या अंत्यसंस्काराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. 


- परिसरातील लोकांना जेव्हा याबाबत समजले की रबीने अंत्यसंस्काराची जबाबदारी उचलली आहे, तेव्हा त्यांना धक्का बसला. मुस्लीम असूनही तो सर्व विधी कसे करणार याचे लोकांना आश्चर्य वाटले. 
- पण रबीने त्याच्या मित्राच्या अंत्य संस्कारासाठी सर्व सामाजिक आणि धार्मिक बंधने झुगारली. त्यानं संपूर्ण हिंदु विधीनुसार अंत्यसंस्कार केले. 


लोकांकडून कौतुक झाले 
ही बातमी माध्यमांमध्ये येताच लोक त्यांच्या मैत्रीचे दाखले देऊ लागले आहेत. मिलनवर अंत्यसंस्कार करणाऱ्या भटजीनेही रबीचे कौतुक केले आहे. असा प्रामाणिक मित्र भेटला हे मिलनचे भाग्य आहे असे ते म्हणाले. 


 

बातम्या आणखी आहेत...