आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल 25 लाख रुपयांचे बक्षीस डोक्यावर असणाऱ्या नक्षलवादी दांपत्याची शरणागती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- तब्बल २५ लाख रुपयांचे बक्षीस डोक्यावर असणाऱ्या एका नक्षलवादी नेत्याने पत्नीसह तेलंगण पोलिसांसमोर शरणागती पत्करली. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, जे. नरसिंह रेड्डी ऊर्फ जंपण्णा आणि त्याची पत्नी एच. राजिथा यांनी शनिवारी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. 


जंपण्णा हा प्रतिबंधित भाकपच्या केंद्रीय समितीचा सदस्य होता, तर त्याची पत्नी राजिथा जिल्हा समितीची सदस्य होता. जंपण्णा हा तेलंगणच्या मेहबूबाबाद जिल्ह्यातील अाहे, तो १९८४ मध्ये पीपल्स वॉर ग्रुप या नक्षलवादी संघटनेत सहभागी झाला होता. 

बातम्या आणखी आहेत...