आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिकट जांभळ्या रंगाची असेल १०० रुपयांची नवी नोट, देवासमध्ये छपाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच बाजारात १०० रुपयांची नवी नोट आणणार आहे. नव्या नोटेचा रंग फिकट जांभळा असेल. या नोटेवर जागतिक वारशांत समाविष्ट असलेल्या गुजरातमधील ऐतिहासिक राणीची बावडी पाहण्यास मिळणार आहे. आकारात जुन्या १०० रुपयांच्या नोटेपेक्षा लहान व दहाच्या नोटेच्या आकारापेक्षा थोडी मोठी असेल. तथापि, नवी नोट जारी झाल्यानंतर जुन्या नोटा प्रचलनात असतील. शंभर रुपयाच्या नव्या नोटांची छपाई देवास येथील छपाई केंद्रात सुरू झाली आहे. 


नोटाच्या नव्या डिझाइनला जेथे २ हजारांच्या नोटा छापल्या जात होत्या, त्या म्हैसूरच्या प्रेसमध्ये मंजुरी देण्यात आली. नव्या नोटांच्या छपाईत स्वदेशी शाई व कागदाचा वापर करण्यात येणार आहे, हा महत्त्वाचा बदल आहे. म्हैसूरमध्ये सुरुवातीला प्रोटोटाइप (नमुने) छापले गेले होते. त्यात विदेशी शाई वापरली होती. देवासमध्ये देशी शाईचा वापर सुरू झाल्याने प्रोटोटाइपशी हुबेहूब रंग तयार करण्यात येणारी अडचणही सोडवण्यात आली. नव्या नोटेचा आकार व वजन कमी असेल. जुन्या नोटांच्या १०० च्या गड्डीचे वजन १०८ ग्रॅम होते. 


आता नव्या नोटेचा आकार लहान असल्याने १०० ग्रॅम अथवा ८० ग्रॅम असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माेहोरचीही छपाई देवास छपाई केंद्रात होत आहे. आरबीआय आॅगस्ट अथवा सप्टेंबर महिन्यात ती बाजारात आणू शकते. 


सांची येथील स्तूप नोटेवर
या आधी २०० रुपयांच्या नोटेवर मध्य प्रदेशातील सांची, ५०० रु.च्या नोटेवर दिल्लीचा लाल किल्ला, ५० रुपयांच्या नव्या नोटेवर कर्नाटकातील हम्पी व १० रुपयांच्या नव्या नोटेवर कोणार्कचे सूर्य मंदिर छापण्यात आले आहे. 


सुरक्षिततेची नवी वैशिष्ट्ये
नव्या नोटेत साधारण सुरक्षेबरोबरच सुमारे एक डझनभर नवे सूक्ष्म असे सुरक्षा फीचर जोडण्यात आले आहेत. ती फक्त अल्ट्राव्हायलेट प्रकाशात पाहू शकता.


एटीएममध्ये करावे लागतील बदल 
बँकांना १०० रुपयांच्या नव्या नोटा ठेवण्यासाठी त्यांच्या एटीएमच्या केस ट्रेमध्ये पुन्हा बदल करावे लागतील. २०१४ मध्ये केंद्रात नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर एटीएममध्ये बदल करण्याची ही चौथी वेळ आहे. याआधी २०००, ५०० व २०० रुपयांच्या नव्या नोटांसाठी बदल करण्यात आले होते. 


युनेस्कोच्या यादीत राणीच्या बावडीचा समावेश 
गुजरातच्या पाटण येथील रानी की बाव (बावडी)ला युनेस्कोने २०१४ मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले होते. ही विहीर इ.स. १०६३ मध्ये गुजरातचे राजे भीमदेव साेळंकीच्या पहिल्या पुण्यतिथीला त्यांची राणी उदयमती यांनी बांधली होती. गेल्या शतकात पुरातत्त्व विभागाकडून या विहिरीचा शोध घेण्यात आला. 

बातम्या आणखी आहेत...