आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसुतीनंतर 2 तास मातीत पडून होते नवजात बाळ, लाचार आई फक्‍त पाहत राहिली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- प्रसव वेदना जाणवु लागल्‍यानंतर आरोग्‍य केंद्रात पोहोचलेल्‍या आदिवासी महिलेला केंद्र बंद असल्‍यामुळे बाहेर मैदानातच बाळाला जन्‍म द्यावा लागला. त्‍यानंतर जवळपास अर्धा तास हे बाळ तशाच अवस्‍थेत मातीत पडून होते. हतबल महिला तेथील एका भिंतीला टेकून केवळ बाळकडे पाहत राहिली व केंद्र उघडण्‍याची वाट पाहत राहिली. ही धक्‍कादायक घटना घडली आहे मध्‍यप्रदेशातील अशोकनगर जिल्‍ह्यात.  माध्‍यमांमधून याचे वृत्‍त आल्‍यानंतर प्रशासन आता खडबडून जागे झाले आहे व नेहमीप्रमाणे याप्रकरणाची चौकशी केली जाईल, असे उत्‍तर प्रशासनातर्फे देण्‍यात येत अाहे.


नेमके काय घडले?
- सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनूसार आदिवासी महिला विद्याबाई (28) शुक्रवारी दुपारी प्रसव पिडा जाणवू लागल्‍यानंतर आपली नणंद पान बाईसोबत येथील आरोग्‍य केंद्रात आल्‍या होत्‍या.
- मात्र तेथे पोहोचल्‍यावर आरोग्‍य केंद्राला बंद असल्‍याचे त्‍यांना आढळले. महिलेने जवळपास अर्धा तास तिथे वाट पाहिली. तरीही केंद्रामध्‍ये कोणीही आले नाही.
- अर्ध्‍या तासानंतर महिलेला आणखी तीव्रतेने कळा जाणवू लागल्‍या. अखेर आपल्‍यासोबत महिलेच्‍या मदतीने आरोग्‍य केंद्रामागील मैदानातच महिलेने बाळाला जन्‍म दिला.
- प्रसव झाल्‍यांनतर महिलेची तब्‍येत फार खराब झाली. यादरम्‍यान नवजात बालक जवळपास अर्धा तास तेथील थंड जमिनीवरच धुळीत पहुडलेले होते.
- महिलेच्‍या नातेवाईकाने सांगितले की, प्रसुतीच्‍या 1 तासानंतर आरोग्‍य केंद्राच्‍या एक डॉक्‍टर सीमा माहौर तेथे आल्‍या. त्‍यांनी आरोग्‍य केंद्राचा दरवाजा उघडला व नवजात बाळाला व आईला त्‍यांनी केंद्रात घेतले.
- स्‍थानिक नागरिकांनी तेथील स्‍थानिक अधिकारी डॉ. बी.एस. जम्‍होरिया यांना फोन लावून घटनेची माहिती दिली. तेव्‍हा त्‍यांनी महिलेला 108 अॅम्‍बुलन्‍सद्वारे इसागढला पाठविण्‍यास सांगितले.
- माध्‍यमामधून याचे वृत्‍त बाहेर येताच अशोकनगरचे जिल्‍हाधिकारी यांनी घटनेची गंभीर दखल घेत याप्रकरणाची पूर्ण चौकशी करुन दोषी आढळणा-यांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, संबंधित घटनेचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...