आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आय पुस्तकाला मिळाली आधुनिक ध्वनीची जोड; 91 वे अखिल भारतीय साहित्‍य संमेलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(महाराजा सयाजीराव गायकवाड संमेलन नगरी)- आधुनिक तंत्रज्ञानाची जोड प्रकाशन व्यवसायाला  नवे आयाम  प्राप्त करून देत आहे. ‘वाचना’ला आता ध्वनी, दृश्य, चित्र..यांची साथ देऊन विशेषत: तरुणाईला पुस्तकांच्या जगाकडे पुन्हा आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न काही धडपडी मंडळी करत आहेत. राजेंद्र वैशंपायन आणि मयंक परमार यांनी अशाच प्रयत्नांतून आय पुस्तक या  संकल्पनेला ध्वनीची जोड देऊन वाचनाला श्राव्य माध्यमाशी जोडले आहे. आय पुस्तकाचे स्वरूप तरुणाईच्या  परिचयाच्या  अॅप स्वरूपात असल्याने या नव्या प्रयत्नांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती राजेंद्र आणि मयंक यांनी दिली.    


आय पुस्तक हे अॅप डाऊनलोड केल्यावर वाचकाला असंख्य प्रकारच्या पर्यायांतून निवड करणे शक्य होते. मराठी भाषेतील असंख्य पुस्तके विषयवार वर्गीकरण करून वाचकासमोर येतात. कथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य, कविता, चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, विज्ञानलेखन, ऐतिहासिक लेखन..अशा अनेकविध पर्यायांतून  वाचक आपल्या पसंतीनुसार निवड करू शकतो. आय पुस्तकचे वैशिष्ट्य म्हणजे बालवाचकांसाठी  कॉमिक बुक्सना ध्वनीचा पर्याय देण्यात आला आहे. शिवाय ध्वनीला पूरक चित्रांची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे  वाचन केवळ मजकूर या स्वरूपात न राहता चित्र, श्रवण अशा दोन्ही स्वरूपात वाचकांपर्यंत पोचून अधिक  सुगमतेने अर्थ पोचवण्यात यशस्वी ठरतो, असे वैशंपायन म्हणाले.  

बातम्या आणखी आहेत...