आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निजामींनी विचारले होते, माझे आई-वडील कोण आहेत: नरेंद्र मोदी यांंचा काँग्रेसवर हल्लाबोल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद/लुणावडा (गुजरात)- गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात शनिवारी ८९ जागांवर मतदान झाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्या दिवशी काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांना गुजराती अस्मितेशी जोडत काँग्रेसवर हल्लाबोल केला. 


दुसऱ्या टप्प्यातील प्रचारसभांत मोदींनी शनिवारी काश्मीरचे अनोळखी युवा नेते सलमान निजामी यांच्या २०१३ मधील ट्विटचा मुद्दा केला. मोदी म्हणाले, युवा काँग्रेस नेते निजामी गुजरातेत प्रचार करत आहेत. ट्विटरवर राहुल यांचे वडील आणि आजींबाबत लिहून ते विचारतात की मोदी तुमची आई कोण आहे? तुमचे वडील कोण आहेत? शत्रूंसाठीही कुणी अशी भाषा वापरत नाही. 


मोदी म्हणाले, निजामीच्या ट्विट्सनुसार तो स्वतंत्र काश्मीरसाठी चालवण्यात येत असलेल्या सशस्त्र चळवळींचा समर्थक आहे. भारतीय लष्कराला बलात्कारी संबोधतो.  


तो म्हणतो, प्रत्येक घरातून अफजल गुरू निघेल. या हल्लाबोलनंतर काँग्रेसने डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला. पक्षाचे नेते राजीव शुक्ला व प्रियंका चतुर्वेदींसह अनेक नेत्यानी निजामी काँग्रेसचा सदस्य नसल्याचे सांगितले. तथापि, अापण काँग्रेसचेच नेते असल्याचा दावा खुद्द निजामीनेच केला आहे. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा मोदी आणि राहुल गांधी यांचे एकमेकांना विचालेले प्रश्‍न...

बातम्या आणखी आहेत...