आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, अन्सारी पाकच्या उच्चायुक्तांना भेटल्‍याचा मोदींचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालनपूर- पाकिस्तान गुजरात निवडणुकीत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला. ते म्हणाले, निवडणुकीआधी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी व निलंबित काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकचे उच्चायुक्त तथा माजी परराष्ट्र मंत्र्यांसोबत गुप्त बैठक घेतली. अय्यर यांच्या घरी झालेली ही बैठक ३ तास चालली. त्याच्या दुसऱ्या दिवशी अय्यर यांनी मला नीच संबोधले. या गुप्त बैठकीचा उद्देश काय होता, असा सवाल मोदींनी काँग्रेसला विचारला.

 
पाकिस्तानी लष्कराचे माजी महासंचालक अर्शद रफिककडून गुजरातेत अहमद पटेलांना मुख्यमंत्री करण्याच्या आवाहनावरही सवाल करत मोदी म्हणाले, पाक लष्कराचा इतका मोठा अधिकारी गुजरात निवडणुकीत का डोके खुपसतोय?  


दरम्यान, दुसरीकडे, राहुल गांधी यांनी प्रचारसभेत पंतप्रधानांविषयी अपशब्दांचा वापर करू नका, गोड शब्दांनीच त्यांना हरवा, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.

बातम्या आणखी आहेत...