आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारातून \'विकास\' हरवला; वादग्रस्‍त मुद्यांनी रंगला कलगीतूरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- गुजरात विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला तीन दिवस राहिले आहेत. भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसतर्फे उपाध्यक्ष राहुल गांधी गेल्या ११ दिवसांपासून सभा घेत आहेत. पण या ११ दिवसांत गुजरातचे राजकारण खूप बदलले आहे. आधीच्या ६० दिवसांतील निवडणूक मुद्दे, घोषणा मागे पडल्या. काँग्रेसने ११ दिवसांत ४ दिवस भाजपला ४ मोठे असे मुद्दे दिले, जे भाजप आणि मोदींनी पकडले. भाजप आणि मोदींनी त्यातून ४ नवे वाद तयार केले. 


काँग्रेसने गुजरातमध्ये आपली मोहीम २६ सप्टेंबरला ‘नवसृजन यात्रे’ने सुरू केली होती. तेव्हापासून राहुल गांधी सलग राज्यात रोड शो आणि सभा घेत आहेत. भाजपने आपली मोहीम एक ऑक्टोबरला ‘गौरव यात्रे’ने सुरू केली होती. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले. त्यानंतर ६० दिवस दोन्ही पक्षांनी एकमेकांवर जोरदार टीका आणि वार-पलटवार केले. 


काँग्रेसने जीएसटी, नोटबंदी, आरक्षण, विकास, बेरोजगारी, पाणी, रुग्णालय हे मुद्दे बनवले. राहुल यांनी ‘विकास वेडा झाला आहे’ अशी घोषणा दिली. भाजपने गुजरातचे विकास मॉडेल, मोदी सरकार आणि राज्य सरकारची कामे सांगितली. जीएसटी आणि नोटबंदीचे फायदेही सांगितले. पंतप्रधान मोदी एका सभेत म्हणाले, मी विकास आहे. त्याशिवाय पाटीदार, ओबीसी, दलित आंदोलनही निवडणुकीचे मुद्दे ठरले. 

 

मोदींनी गेल्या ११ दिवसांपैकी ७ दिवस घेतल्या सभा 

पंतप्रधान मोदींनी गेल्या ११ दिवसांपैकी ७ दिवस गुजरातमध्ये सभा घेतल्या. त्यांनी पूर्ण निवडणूक वातावरण बदलवले. जीएसटी, नोटबंदी, महागाई, बेरोजगारी, विकास हे मुद्दे गायब झाले. हिंदुत्व, राम मंदिर, गुजराती अस्मिता, पाकिस्तान आणि दहशतवाद मोठे मुद्दे झाले. 

 

> मोदींनी राज्यात २७ नोव्हेंबरपासून सभा सुरू केल्या. २९ नोव्हेंबरलाही सभा घेतली. तेव्हा त्यांनी विकास, जातीयवाद याशिवाय नोटबंदी, जीएसटीचे फायदे सांगितले होते. 

 

४३ महिने आणि १७ राज्यांत प्रचार सभा घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींचा घसा बसला
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात जिंकण्यासाठी पुन्हा संपूर्ण ताकद लावली आहे. ते राज्यात सतत सभा घेत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर मोदींनी उत्तर प्रदेशसह १७ राज्यांत निवडणूक सभा घेतल्या. प्रथमच एखाद्या राज्यात भाषण देताना त्यांचा गळा बसला. मोदींनी आजवर कोणत्याही राज्यात गुजरातएवढ्या प्रचार सभा घेतल्या नाहीत.

 

 

हे मुद्देही उपस्थित 
औरंगजेब, खिलजी, बाबर, अफजल, जानवे, संस्कार, असंस्कृत भाषा, शहीद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल आदी. 

 

> निवडणूक आयोगाने रविवारी म्हटले की, पहिल्या टप्प्यात ६८% नव्हे, ६६.७५% मतदान झाले. १.४१ कोटी मतदारांनी मत दिले.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, काय म्‍हणाले नरेंद्र मोदी, राहूल गांधी आणि शंकरसिं‍ह वाघेला...

बातम्या आणखी आहेत...