आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटीदार अारक्षण अांदाेलन समिती फुटीच्या उंबरठ्यावर; हार्दिक पटेलची गच्छंती अटळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर - पाटीदार अारक्षण अांदाेलन समितीचे संयाेजक अाणि गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारण्यासाठी मैदानात उडी घेतलेल्या हार्दिक पटेलच्या नेतृत्वालाच सुकाणू समितीने अाव्हान दिले अाहे. निवडणुकीचे निकाल भले काही असाेत, परंतु त्यानंतर पाटीदार अारक्षण अांदाेलन समितीत फूट अटळ अाहे. अनेक लाेक हार्दिक पटेलच्या विराेधात गेले असून त्याची हकालपट्टी करण्याची याेजना अाखण्यात अाली अाहे. 


अलीकडेच ‘पास’च्या सुकाणू समितीच्या बैठकीत हार्दिक पटेलच्या कार्यशैलीवर नाराज काही लाेकांनी त्याचे नेतृत्व धुडकावून लावले हाेते. त्यासाठी अाता हार्दिक पटेल यास ‘पास’पासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतिमान झाल्या अाहेत. हार्दिकला या बाबीची माहिती असून त्यामुळे त्यानेदेखील स्वतंत्रपणे तयारी सुरू केली अाहे. हार्दिकच्या कार्यक्रमाला पाटीदारांची गर्दी अाहे असे म्हणण्याला पाटीदार समाजातूनच विराेध सुरू झाला अाहे. ही सारी गर्दी पाटीदारांची गर्दी अाहे ही गाेष्ट समाजाला मान्य नाही. निवडणुकीपर्यंत संवेदनशील वातावरण असल्यामुळे तूर्त काही ठाेस भूमिका जाहीर केली जाणार नाही.

 

भाजप सत्तेवर आल्यास हार्दिक पडेल एकाकी
जर भाजपचे सरकार सत्तेवर अाले तर सुकाणू समितीतील तसेच जिल्हा अाणि तालुका पातळीवरील संघटनेतील नेते हार्दिक पटेलची साथ साेडून देतील. स्वतंत्र अाघाडी स्थापन करून सरकारसमाेर अापल्या मागण्या मांडतील. हार्दिकच्या विराेधात सध्या जे काही दबक्या अावाजात बाेलले जात अाहे ते निवडणूक निकालानंतर चढ्या अावाजात बाेलले जाईल. 

बातम्या आणखी आहेत...