आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात निवडणूक; माेदींनी गुजरातमध्ये केला 42 हजार, तर राहुलनी 32 हजार किमी प्रवास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- गुजरातमध्ये गुरुवारी दुसऱ्या टप्प्याचे मतदान हाेणार अाहे. बुधवारी भाजप व काँग्रेसच्या नेत्यांनी घराेघरी जाऊन मते मागितली. यापूर्वी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र माेदी व काँग्रेसकडून अध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यात निवडणुकीचा मॅरेथाॅन प्रचार केला. राहुल गांधींनी सुमारे तीन महिने राज्यात ठाण मांडले हाेते. माेदींनी सुरुवातीला कमी प्रमाणात दाैरे केले; परंतु नंतर लागाेपाठ सभा घेतल्या. माेदींनी राज्यात एकूण ३४ सभा व एक सी-प्लेन शाे केला, तर राहुल यांनी ३९ सभा व राेड शाे केले. 


पहिल्या टप्प्यात माेदींनी १९ सभा घेतल्या हाेत्या, तर दुसऱ्यात ९३ जागांसाठी १५ सभा घेतल्या. त्यांनी २७ नाेव्हेंबरपासून सभा घेणे सुरू केले. तेव्हापासून ते १३ डिसेंबरपर्यंत राज्यात हाेते. १७ दिवसांत सुमारे ४२ हजार २०० किमीपर्यंत निवडणूक प्रचारासाठी प्रवास केला. यात दिल्लीहून येण्या-जाण्याच्या अंतराचाही समावेश अाहे. राहुल यांनी  २४ नाेव्हेंबरपासून प्रचार सुरू केला. पहिल्या टप्प्यात त्यांनी ११ सभा व १२ राेड शाे केले, तर दुसऱ्यात १६ सभा घेतल्या. त्यात चार मंदिरांत जाऊन दर्शनही घेतले. सुमारे ३२ हजार २६० किमीचा प्रवास केला. त्यात दिल्लीहून येण्या-जाण्याचे अंतरही अाहे.

 

> माेदी सतत ८, तर राहुल ६ दिवस गुजरातमध्ये

 

माेदींनी ५ ते ६ जागांसाठी एक-एक सभा घेतली

पंतप्रधान माेदींनी राज्यात १८२ विधानसभा जागांसाठी ३४ सभा घेत एक राेड शाे केला. म्हणजे, ५ ते ६ विधानसभेच्या जागांसाठी त्यांनी एक-एक सभा घेतली. त्यांनी १७ दिवसांपर्यंत १२ दिवस राज्यात सभा घेतल्या. एका दिवसात सरासरी ३ ते ४ सभा घेतल्या. 

 

राहुलनी ४ ते ५ जागांसाठी घेतली एक-एक सभा

कांॅग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी १८२ जागांसाठी एकूण ३९ सभा व राेड शाे केले. अशा प्रकारे त्यांनी ४ ते ५ विधानसभा जागांसाठी एक-एक सभा घेण्याचा प्रयत्न केला. ते शेवटचे ६ िदवस सातत्याने गुजरातमध्ये हाेते. 

 

 

-  गुजरातपूर्वी माेदींनी सर्वात जास्त ३१ निवडणूक सभा बिहारमध्ये घेतल्या. तेथे २४३ जागा अाहेत.
-  माेदींनी यूपीतील ४०३ विधानसभा जागांसाठी सुमारे महिन्यात २४ सभा, ३ दिवस राेड शाे केले.
-  महाराष्ट्रात २८८ विधानसभा जागांसाठी २७ व प.बंगालमध्ये २९५ जागांसाठी १० सभा घेतल्या.

 

माेदींनी ठाेकले सभांचे द्विशतक; १८ राज्यांत घेतल्या २०४ सभा
पंतप्रधान बनल्यानंतर माेदींनी काेणत्याही राज्याच्या निवडणुकीपेक्षा सर्वात जास्त गुजरातमध्ये वेळ घालवला अाहे. गुजरात निवडणुकीपूर्वी १७ राज्यांत त्यांनी १७० प्रचारसभा घेतल्या, तर गुजरातमध्ये त्यांनी ३४ सभा घेतल्या, ज्या अातापर्यंत इतर राज्यांत घेतलेल्या सभांहून अधिक अाहेत. गुजरातेत अाचारसंंहिता लागू हाेण्यापूर्वी १६ कार्यक्रम घेतले. त्यात सुमारे १४ हजार काेटींच्या याेजनांची घाेषणा केली हाेती. माेदींनी अातापर्यंत १८ राज्यांत २०४ सभा घेतल्या अाहेत.

 

पुढील स्लाइडवर पाहा, पाच मोठ्या राज्यांत मोदींच्या सभा...

बातम्या आणखी आहेत...