आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओखी चक्रीवादळात अडकलेले 67 लोक कोचीच्या किनारपट्टीवर सुखरूप परतले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुवनंतपुरम- आेखी चक्रीवादळात अडकलेल्या ६७ लोकांना कोचीच्या किनारपट्टीवर सुखरूप आणण्यात यश मिळाले आहे. अद्यापही बेपत्ता मासेमारांचा शोध घेण्यात येत असून हवाई तसेच नौदलाच्या मदतीने शोधमोहीम सुरूच ठेवण्यात आली आहे.  


भारतीय हवाई दलाची काही विमाने शोधमोहिमेत सक्रिय झाली आहेत. या मोहिमेद्वारे अनेकांचा शोध घेण्यात आला. दुसरीकडे रविवारी तिरुवनंतपुरम येथील लॅटिक कॅथॉलिक चर्चमध्ये विशेष प्रार्थना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादळाचा फटका बसलेल्या भागाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. चर्चमध्ये याबाबतचा संदेश वाचून दाखवण्यात आला.आेखीचा फटका बसल्यानंतर अनेक मासेमार ऐन समुद्रात मासेमारी करताना अडकले होते. परंतु आता ते सहा वेगवेळ्या बोटींनी कोची बंदरावर परतल्याचे सांगण्यात आले. काही मासेमार शनिवारी रात्री परतले. ६७ पैकी ४९ मासेमार तामिळनाडूचे आहेत. १३ केरळचे, चार आसाम व एक आंध्र प्रदेशचा आहे.  


१ हजार ८३४ कोटींची मागणी 

प्रदेशाला आेखी चक्रीवादळाचा फटका बसल्याने मोठी हानी झाली आहे. ही हानी भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने १ हजार ८३४ कोटी रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी केली आहे. ७७१ बोटींचे नुकसान झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...