आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांकडून चुका होतात म्हणूनच दगडफेकीचे गुन्हे मागे : राजनाथ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर -  सर्वत्र मुले सारखी असतात. म्हणूनच मुलांकडून चुका होतात. ही गोष्ट समजू शकतो. त्यामुळे दगडफेकीच्या घटनांच्या बाबतीत हा विचार करूनच सरकारने ६ हजारांहून अधिक तरुणांवरील गुन्हे मागे घेतले आहेत, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. वास्तविक या दगडफेक करणाऱ्या तरुणांची दिशाभूल करण्यात आली होती, असे राजनाथ यांनी सांगितले.  
राजनाथ म्हणाले, केंद्र सरकारला जम्मू-काश्मीरमधील तरुणांच्या भवितव्याची चिंता वाटते. गत सरकारच्या काळात दगडफेक करणाऱ्या सुमारे ६ हजार तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मुले सगळीकडे सारखीच असतात.

 

ही गोष्ट आम्ही समजू शकतो. आता तरी तरुणांनी विकासाच्या मार्गाने वाटचाल केली पाहिजे, असे माझे त्यांना आवाहन आहे. त्यांनी विध्वंसाचा मार्ग सोडून दिला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जम्मू-काश्मीरबद्दल खूप प्रेम वाटते. केंद्राला राज्यातील तरुणांच्या भवितव्याची काळजी वाटते. परंतुु राज्य सरकारने क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांत केलेल्या प्रगतीबद्दल राज्य सरकारची प्रशंसा केली. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी निधी कमी पडू दिली जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.  

 

राजनाथ जम्मू-काश्मीरच्या दोनदिवसीय दौऱ्यावर  
गृहमंत्री राजनाथ सिंह दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. ते राज्यपाल एन. एन. व्होरा व मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. त्यात कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला जाणार आहे. ईदनंतरही शस्त्रसंधी व्यापक पातळीवर लागू केली जाऊ शकेल का, यावरही सविस्तर विचारविनिमय केला जाणार आहे. या भेटीदरम्यान राजनाथ अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचाही आढावा घेतील. यात्रा २८ जूनपासून सुरू होणार आहे. राज्य सरकारला ईदनंतरही शस्त्रसंधी लागू करण्याची इच्छा आहे.  

 

 

 

बातम्या आणखी आहेत...