आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोहिंग्यांचे बांगलादेशात पलायन उपखंडाच्या सुरक्षेला आव्हान;उच्चआयुक्तांनी व्यक्त केली भीती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगरतळा - रोहिंग्यांचे बांगलादेशातील पलायन उपखंडाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आव्हान आहे. म्यानमारच्या राखिने प्रांतातून बांगलादेशात जाणे हा केवळ बांगलादेशापुरता मर्यादित प्रश्न नाही. त्याचे संपूर्ण क्षेत्रासाठी गंभीर संकट आहे, अशी चिंता बांगलादेशमधील भारतीय उच्चायुक्त हर्षवर्धन शृंगला यांनी व्यक्त केली आहे.  


बांगलादेश आपल्या पातळीवर या मुद्द्याचा निपटारा करण्याच्या प्रयत्नात आहे. आम्ही संयुक्त राष्ट्राशी संवाद साधत आहोत. त्याचबरोबर बहुपक्षीय संस्थांच्याही आम्ही संपर्कात आहोत. म्यानमारसोबत द्विपक्षीय चर्चाही झाली आहे. श्रंगला म्हणाले, रोहिंग्या मुस्लिमांनी मायदेशी परतावे यासाठी दोन्ही देशांत करार झाला आहे. हे मानवी संकट आहे. सोबतच बांगलादेशसह संपूर्ण क्षेत्राच्या सुरक्षेसाठीदेखील आव्हान आहे.  बांगलादेशात सध्या दहा लाखांहून मोठ्या संख्येने रोहिंग्या स्थलांतरित झाले आहेत. बांगलादेशात कट्टरवाद्यांविषयी विचारले असते भारतीय मुत्सद्दी म्हणाले, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना दहशतवादाच्या विरोधात शून्य सहिष्णुता धोरणावर काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, भारतीय उच्चायुक्त गुरुवारी त्रिपुराच्या दौऱ्यावर आले. त्यांनी मुख्यमंत्री विप्लवकुमार देब व राज्यपाल तथागत रॉय यांची भेट घेतली. 

 

२०१६ नंतर सतर्कतेत वाढ  
ढाक्यातील होली आर्टिझन बेकरी कॅफेमध्ये जुलै २०१६ मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर बांगलादेशातील कायदा व्यवस्थेत बदल करण्यात आले. दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी सतर्कतेत वाढ करण्यात आली. यंत्रणा सक्रिय करण्यात आली. त्या घटनेनंतर देशात मोठी दहशतवादी घटना घडली नाही, असे शृंगला यांनी सांगितले.  

 

बातम्या आणखी आहेत...