आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगींंची फ्लॅटधारकांना टोलवाटोलवी; वाद सोडवण्याचे आश्वासन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोएडा- नोएडाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येत नाहीत, अशी वदंता मोडित काढून शनिवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येथे भेट दिली. आपण येथे नेहमी येत राहू अशी ग्वाही त्यांनी दिली. २५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे येत आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यातील वाद सोडवण्याचे आश्वासन देत, ३१ डिसेंबरपर्यंत ४० हजार फ्लॅटचे वाटप होईल, असेही त्यांनी सांगितले.


नोएडाच्या दौऱ्यात योगी म्हणाले, जर एखादा बांधकाम व्यावसायिक वेळेवर ताबा देत नसेल तर संबंधित अधिकारी त्यांच्याशी चर्चा करतील आणि सह विकासक अथवा अन्य मार्गाने ही समस्या सोडवण्यात येईल.  प्रत्येक प्रकरणाची तपशीलवार माहिती घेऊन ग्राहकांचे समाधान केले जाईल, असे सांगून योगी म्हणाले, बांधकाम व्यावसायिकांचे ऑडिट रिपोर्ट पाहून योग्य ती कारवाई केली जाईल. 


नोएडा अथॉरिटीकडून घाईघाईने फ्लॅट तर दिले पण तेथे सुविधा उपलब्ध नाहीत, या समस्येवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, अधिकारी प्रत्यक्ष जाऊन तेथे नागरिकांच्या समस्या जाणून घेतील. त्यानंतरच बांधकाम व्यावसायिकास कम्पलेशन प्रमाणपत्र दिले जाईल. यामध्ये गाळेधारकांना अडचण येणार नाही.


पोकळ आश्वासन
मुख्यमंत्री योगी यांचा दौरा आणि ३१ डिसेंबरपर्यंत ४० हजार फ्लॅट देण्याचे आश्वासन गाळेधारकांना केवळ पोकळ आश्वासन वाटते आहे. मुख्यमंत्र्यांनी अॅमिटी विद्यापीठात १२ ते १५ गाळेधारकांशी सुमारे २० मिनिटे चर्चा केली. यावेळी योगी यांनी फ्लॅट देऊ असे वर वर सांगून त्यांची बोळवण केली असे बोलले जात आहे.


पहिले आश्वासन : काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी लखनऊ येथे बोलताना ३१ डिसेंबरपर्यंत ५० हजार फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले हाेते.
दुसरे आश्वासन : नोएडा येथे माध्यमासमोर बोलताना ४० हजार लोकांना ३१ डिसेंबरपर्यंत फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले.
तिसरे आश्वासन : गाळेधारकांच्या संघटनेशी संबंधित अभिषेक यांनी सांगितले, माध्यमासमोर बोलण्याआधी मुख्यमंत्र्यांनी ३० हजार फ्लॅट देण्याचा दावा केला होता.

बातम्या आणखी आहेत...