आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Padmavat पद्मावत Special Screening For High Court Judge In Jodhpur, Rajasthan Bhansali Appeals To Reject FIR

जोधपूरच्या थिएटरमध्ये HC जजसाठी पद्मावतचे स्पेशल स्क्रिनिंग, भन्साळींनी केली खास तयारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - राजस्थानच्या एका थिएटरमध्ये सोमवारी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित फिल्म 'पद्मावत'चे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले आहे. जोधपूर येथे फिल्मशी संबंधीत वादावावर सुनावणी करणारे हायकोर्ट जज संदीप मेहता यांना 'पद्मावत' फिल्म दाखवली जाणार आहे. या स्क्रिनिंगसाठी थिएटर बाहेर आणि आतमध्येही मोठा फौजफाटा तैनात असणार आहे. भन्साळींनी या शोसाठी खास व्यवस्था केली आहे. जस्टिस मेहता यांना पूर्ण सुरक्षा व्यवस्था राहिल असा विश्वास देण्यात आला आहे. फिल्मला सुप्रीम कोर्ट आणि सेन्सॉर बोर्डाने मंजूरी दिल्यानंतरही राजस्थानमध्ये फिल्म रिलीज होऊ शकलेली नाही. पद्मावतच्या विरोधात राज्यात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...