आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pak Shelling Forces Closure Of 84 Schools Along Loc In Kashmir Ceasefire Violation India Army News And Updates

LoCवर PAKकडून फायरिंग, कॅप्टनसह 3 जवान शहीद; आर्मी व्हाइस चीफ म्हणाले- आता काहीही न बोलता प्रत्युत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - पाकिस्तानकडून सुरु असलेल्या जोरदार गोळीबारामुळे नियंत्रण रेषेवर (LoC) तणावाचे वातावरण आहे. रौजोरीच्या नौशेरा भागात सीमेवर फायरिंग सुरु आहे. या जिल्ह्यातील 84 शाळा 3 दिवसांपासून बंद आहेत. काश्मीर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान लष्कराने रविवारी राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात एलओसीवर बंकर उडवणाऱ्या शस्त्रांनी हल्ला केला आहे. यामध्ये 23 वर्षांचे कॅप्टन कपिल कुंडू यांच्यासह 3 जवान शहीद झाले. पाकिस्तानने ह्ल्ल्यासाठी एटीजीएम अर्थात अँटी टँक गायडेड मिसाइलचा वापर केला. 
 
नागरिकांना बाहेर काढण्यासाठी टीम तयार 
- न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, डिप्टी कमिशनर एस.आय. चौधरी म्हणाले, की सुंदरबानी ते मंजाकोट दरम्यान एलओसीपासून 5 किलोमीटर अंतरावरील 84 शाळा 3 दिवसांपासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. 
- आपातकालिन स्थितीत नागरिकांना येथून बाहेर काढण्यासाठी आमच्या टीम तयार आहेत. 
- चौधरी म्हणाले, 'आम्ही रिलीफ कँप तयार केले आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर लोकांना तत्काळ तिथे शिफ्ट केले जाईल.'
- जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा रेषा आणि नियंत्रण रेषेजवळ काश्मीरमधील 5 जिल्ह्यांमध्ये सांबा, जम्मू, कठुआ, राजौरी आणि पुंछ येथे पाकिस्तानकडून गोळीबारामुळे 300 शाळा 15 दिवस बंद ठेवण्यात आल्या होत्या. 


4 जवान शहीद
- रविवारी पाकिस्तानच्या माऱ्यात गुडगावमधील रनसिका गावातील कॅप्टन कपिल कुंडू (23), ग्वाल्हेरचे रायफलमन राम अवतार (27), जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमधील हवलदार रोशनलाल (42) आणि जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील रायफलमन शुभम सिंह (23) शहीद झाले आहेत. 
- हल्ल्यात आणखी दोन जण जखमी आहेत.

 

पाकिस्तानला याची किंमत मोजावी लागेल - राजनाथ सिंह 
- न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी पाकिस्तानच्या हल्ल्याचा निषेध करत भेकड हल्ला म्हटले आहे. 
- ते म्हणाले, 'पाकिस्तानच्या या हल्ल्याला आम्ही विसरणार नाही. हा पाकिस्तानचा मूर्खपणा ठरणार आहे आणि त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल.'

 

'जिंदगी लंबी नाही बडी होनी चाहिए'
- कपिल यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर टॅगलाइन लिहिली होती, 'जिंदगी लंबी नाही बडी होनी चाहिए'. हिंदी चित्रपट 'आनंद'मधील राजशे खन्ना यांचा हा डायलॉग आहे. 
- कॅप्टन कपिल यांचे आजोबा म्हणाले, 'माझा एकुलता एक नातू होता. आता मी काय करु. जो सहारा होता तोच निघून गेला. आता त्याच्या दोन बहीणी आहेत.'
- आई म्हणाली, 'त्याच्या देशभक्तीला सलाम करते. मला आणखी मुलं असते तर तेही देशासाठी कूर्बान केली असते.'


यावर्षी पाक फायरिंगमध्ये 10 जवान शहीद 
- पाकिस्तानकडून यावर्षी 2018 मध्ये झालेल्या फायरिंगमध्ये 10 जवानांसह 18 जणांचा मृत्यू झाला आहे. 70 पेक्षा जास्त लोक जखमी आहेत. एकट्या जानेवारीमध्ये 130 पेक्षा जास्तवेळा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. हा आकडा 2014 पेक्षा मोठा आहे. 

लष्कर म्हणाले, बलिदान वाया जाणार नाही 
- लष्कराने एक निवेदन जारी करुन म्हटले आहे, की जवानांचे बलिदान वाया जाणार नाही. पाकिस्तानकडून विनाकारण सुरु असलेल्या कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. 

 

पाकचा दावा - भारताच्या कारवाईत महिला आणि किशोरवयीनचा मृत्यू 
- पाकिस्तान लष्कराने म्हटले आहे, की एलओसीवर भारताकडून सुरु  असलेल्या फायरिंगमध्ये एक महिला आणि एका किशोरवयीनचा मृत्यू झाला आहे. पाक लष्कराने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये आणखी 6 जण जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. 

 

फायरिंग करताना गोळ्या मोजू नका - राजनाथसिंह 
- पाकिस्तानकडून सुरु असलेल्या आगळिकीवर राजनाथ सिंह म्हणाले, 'आम्ही आपल्या सुरक्षा रक्षकांना थेट आदेश दिले आहेत. जर पाकिस्तानकडून आमच्या सीमेवर एकही गोळी आली तर तुम्ही फायरिंग करताना गोळ्यांची मोजदाद करु नका.'
- सिंह म्हणाले, 'एक शेजारी म्हणून आम्ही पाकिस्तानवर पहिली गोळी चालवणार नाही, कारण आपल्याला शांतता हवी आहे. मग तो देश पाकिस्तान असेल किंवा दुसरा कोणताही. मात्र दुर्देवाची बाब ही आहे की पाकिस्तान जम्मू-काश्मीरमध्ये आपल्या फोर्सेसवर हल्ले करत आहे.'

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, काश्मीरमध्ये शहीद जवानांचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...