आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एव्हरेस्टची आठ वेळा चढाई करणारे पेंबा शेरपा बेपत्ता!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दार्जिलिंग- जगातील सर्वात उंच शिखर एव्हरेस्टवर आठ वेळा यशस्वी चढाई करणारे गिर्यारोहक पेम्बा शेरपा कराकोरमच्या डोंगरांमध्ये बेपत्ता झाले आहेत. शेरपा ७ हजार ६७२ मीटर उंचीवरील सासेर कांगडीचे शिखर सर करणाऱ्या गिर्यारोहकांच्या एका दलासोबत परत येत होते. 


या दलास घेऊन पेम्बा २० जून रोजी कोलकात्याहून रवाना झाले होते. पोलिस सुत्रांच्या मते, दार्जिलिंगचे अनुभवी गिर्यारोहक शेरपा बर्फाच्या एका खोल दरीत कोसळले होते. १३ जुलै पासून त्यांच्याशी अद्याप संपर्क झालेला नाही, असे त्यांच्या पत्नीने सांगितले. ते परततील. चमत्कार होईल, अशी अपेक्षा शेरपाच्या पत्नीने व्यक्त केली. भारत-तिबेट सीमेवरील पोलिसांनी शुक्रवारी शेरपा बेपत्ता असल्याची बातमी दिली होती. आयटीबीपीच्या एका टीमने रविवारपासून घटनास्थळी एक शोधमोहिम हाती घेतली आहे. दार्जिलिंग जिल्हा प्रशासनाने शोध मोहिमेवर निगराणी ठेवत असल्याचे सांगितले. सिलीगुडीमध्ये हिमालयन नेचर अँड अॅडव्हेंचर फाऊंडेशनचे अनिमेष बासू म्हणाले, 'आम्हाला पेंबाची चिंता वाटू लागली आहे. ते अत्यंत कुशल गिर्यारोहक होते.' 

बातम्या आणखी आहेत...