आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुरडीवर रेप : बहिणीने विचारले विरोध का करत नाही.. त्यानंतर चिमुरडीने सांगितली आपबिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - 12 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या 18 आरोपींना पोलिसांनी फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या चिमुरडीवर तिच्याच अपार्टमेंटमधील सिक्युरिटी गार्ड, लिफ्ट ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, प्लंबरसह 18 जणांनी 7 महीने बलात्कार केल्याचे 17 जुलैला समोर आले होते. तुरुंगातील पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, अटक करण्यात आलेल्या एकाही आरोपीने या प्रकरणी पश्चात्ताप व्यक्त केलेला नाही. कोर्टाने सर्व आरोपींना 31 जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. 

 
बहिणीने सांगितले कसा झाला खुलासा?
चिमुरडीच्या बहिणीने सांगितले की, ती दिल्लीहून केरळला तिच्या घरी आली होती. त्याचवेळी तिने पाहिले की, लिफ्ट ऑपरेटर रवी कुमारी तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता. त्यानंतर बहिणीने पीडित चिमुरडीला विचारले की, तू त्याच्या कृत्याचा विरोध का केला नाही. त्यावर चिमुरडीने सांगितले की, तिने यापेक्षा बरेच काही सहन केले आहे. त्यानंतर चिमुरडीने एक एक करत सर्व घटनांबाबत सांगितले. 

 
चाकू दाखवून घाबरवायचे 
या खटल्याचे कामकाज पाहणाऱ्या अनंत नारायण यांनी सांगितले की, आरोपी चिमुरडीला चाकू दाखवून दिला घाबरवत होते. तसेच तिचे लैंगिक शोषण करण्यापूर्वी तिला गुंगीचे औषधही द्यायचे. 

 
सुरक्षारक्षक आणायचा गुंगीचे औषध 
पोलिसांना शंका आहे की, सिक्युरिटी गार्ड गुंगीचे औषध आणायचा. त्यासाठी पोलिस आसपासच्या दुकानांवर चौकशी करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार सिक्युरिटी गार्ड, आधी हॉस्पिटमध्ये काम करायचा. त्याचदरम्यान तो हे शिकला होता की, मुलांना जन्म देताना महिलांना वेदना होऊ नये यासाठी काही औषधे दिली जातात. गार्डने त्याच औषधांचा वापर चिमुरडीच्या बलात्कारापूर्वी केला होता. 

 

बातम्या आणखी आहेत...