आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100च्या स्पीडने कारने मारली धडक, रस्त्यावर पडला रक्ताचा सडा; 16 गंभीर, एकाचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुल्तानपूर (यूपी) - बलिया-लखनऊ राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री एका कारने बाइकस्वाराला धडक मारली. यानंतर कार अनियंत्रित होऊन कार खड्डयात उलटली. अपघातात सायकलस्वार आणि एकाचा मृत्यू झाला आहे. तब्बल अर्धा डझन प्रवासी जखमी झाले आहेत. किरकोळ जखमींना  जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर गंभीर जखमींना लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

 

आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता मृत तरुण
- ही घटना सुल्तानपूर परिसरातील महादेवपूर चौकातील आहे. जिला मुख्यालयाकडून येत असलेल्या एका भरधाव कारने सायकलस्वार दोन चुलत भाऊ धीरज कुमार (17) आणि रामजनक (22) यांना धडक मारली.
- रामजनकचा जागेवरच मृत्यू झाला. दुसरीकडे, धीरज गंभीर जखमी झाला आहे.
- सूत्रांनुसार, मृत आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता.
- स्थानिकांच्या मते, कार ड्रायव्हर तब्बल 100 च्या स्पीडमध्ये कार चालवत होता.

 

धडकेनंतरही वाढवली स्पीड, कार गेली खड्ड्यात...
- सायकलस्वार चुलत भावांना धडक मारल्यानंतर कार ड्रायव्हरने भीतीमुळे कार आणखी जोरात दामटली. तेवढ्यात नियंत्रण सुटल्याने कार खड्ड्यात जाऊन पडली.
- या अपघातात कारमध्ये स्वार राहुल (27), कृष्ण कुमार (30), बृजेश कुमार (28), नीरज कुमार (30) आणि फैजाबाद जिल्ह्यातील रतनपुरचे रहिवासी रोहित कुमार (22) गंभीर जखमी झाले आहेत.
- गावकऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात नेले. 
- एएसपी सूर्यकांत त्रिपाठी म्हणाले की, पोलिसांनी मृत तरुणाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. पुढील कारवाई केली जात आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाह, या भीषण अपघाताचे आणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...