आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविश्वासाचे कारण सांगता न आल्यानेच गळ्यात पडले, मोदींचा राहुल गांधींना टोला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहाजहानपूर (उत्तर प्रदेश) - लोकसभेत अविश्वास ठराव फेटाळल्याच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर येथे किसान कल्याण रॅलीत मोदी म्हणाले, भ्रष्टाचाराला लगाम लावल्यामुळेच सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणण्यात आला. लोकसभेत राहुल यांच्या गळाभेटीवर कोपरखळी मारत मोदी म्हणाले, 'आम्ही त्यांना अविश्वासाचे कारण विचारत राहिलो, ते त्यांना सांगता न आल्याने ते आमच्या गळी पडले.'

 

भाजपविरुद्ध विरोधी पक्षांच्या एकजुटीवर मोदी म्हणाले, जेव्हा दलसोबत दल येते तेव्हा 'दलदल' तयार होते. दलदल जितकी जास्त असते कमळही तितके जास्त फुलते. विरोधी पक्ष गरीब, तरुण व शेतकऱ्यांना विसरून फक्त पंतप्रधानपदाच्या खुर्चीमागे पळत आहेत. मी भ्रष्टाचार आणि घराणेशाहीविरुद्ध संपूर्ण ताकदीनिशी उभा आहे. हाच माझा गुन्हा आहे? दलाल व फुकट्यांचा धंदा बंद पाडल्याने ते आम्हाला हटवू पाहत आहेत, असेही मोदी म्हणाले.

 

उत्तर द्यावे लागेल : काँग्रेस
काँग्रेस नेते जयवीर शेरगिल म्हणाले, मोदी पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची गळाभेट घेऊ शकतात, त्यांच्या हातात हात घेऊन फिरू शकतात, मात्र राहुल यांच्या सद‌्भावनेचा स्मितहास्याने स्वीकार करू शकत नाहीत. याचे उत्तर त्यांनी द्यावे.

 

एकत्र येऊन पर्याय देऊ : शरद पवार
खाद्य संस्कृतीवरून देशात जीवघेणे हल्ले होत आहेत. काही लोकांना देशाची राज्यघटनाच बदलायची आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. परदेश दौऱ्यात नरेंद्र मोदी यांच्या सभांना होणारी गर्दी दबाव टाकून केलेली असते, असा दावाही त्यांनी केला. ते म्हणाले, 'मोदी यांना पर्याय काय, असा प्रश्न सध्या विचारला जातो आहे. पण, पर्याय एका दिवसात उभा राहत नाही. सर्वांनी एकत्र येऊन पर्याय उभा केला पाहिजे.'

 

 

बातम्या आणखी आहेत...