आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचा मध्‍यप्रदेश दौरा, निवडणुकीच्या 6 महिने आधी 9 हजार कोटींच्या कामांची सुरुवात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीला सुमारे सहा महिन्यांचा कालावधी बाकी असतानाच शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यात विकास कामांचा धडाका लावण्यात आला. मोदींच्या उपस्थितीत ९ हजार कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यात प्रामुख्याने मोहनपुरा जल प्रकल्पाच्या लोकार्पणासह इतर तीन सिंचन योजनांचा समावेश आहे.  


मोदींनी राज्यात एकूण ९ हजार कोटी रुपयांच्या कार्यांचा शुभारंभ केला. मध्य प्रदेशात या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या मध्य प्रदेश दौऱ्याला महत्त्व आले आहे. मोहनपुरा जलप्रकल्प योजनेच्या निमित्ताने त्यांनी सभेत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मोहनपुरा धरण योजना हे वेगाने विकास होत असल्याचे उदाहरण तर आहेच, शिवाय सरकारच्या कामाची पद्धत दर्शवणारेही आहे. प्रकल्पाचे काम चार वर्षांत पूर्ण करण्यात आले आहे. त्यात सूक्ष्म सिंचनावर विशेष भर देण्यात आला आहे.


पाइपलाइन टाकून पिकापर्यंत योग्य वेळी व योग्य प्रमाणात पाणी पोहोचवण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. मोदींनी आपल्या भाषणात राजगडचा मागास जिल्हा हा कलंक पुसून टाका, असे आवाहन केले. राज्य सरकारने अशा आकांक्षा असलेल्या जिल्ह्यांसाठी चांगले काम केले आहे. शिवराज सरकार त्या दिशेने काम करत आहे. १५ वर्षांच्या कार्यकाळात मध्य प्रदेश आजारी राज्यांच्या श्रेणीतून बाहेर पडले आहे.

 

जाहीर सभेेमध्ये काँग्रेसवर हल्ला
सरकार, सरकारची धोरणे तळागाळापर्यंत पोहोचू लागली आहेत. हेच सभेला जमलेल्या लाेकांच्या संख्येवरून दिसून येते. ते (काँग्रेस) वास्तवापासून तुटलेले आहेत याची साक्ष भरगच्च सभेतून येते. तत्पूर्वी पंतप्रधानांनी सभास्थळी आयोजित प्रदर्शनाचे अवलोकन केले. शिवराजसिंह यांनी मोदींना माळव्याची पगडी परिधान करून स्वागत केले. 

 

श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण  
मोदी म्हणाले, आज देशाचे महान सुपुत्र श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी. काश्मीरमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना नमन करतो आणि आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. एका घराण्याच्या उदात्तीकरणासाठी आपल्या सुपुत्रांच्या योगदानांना लहान करण्यात आले. डॉ. मुखर्जी यांचा सर्वाधिक जोर शिक्षण, आर्थिक, विकास यावर होता.

 

७२५ पेक्षा जास्त गावांना सिंचनाचा लाभ 

मोहनपुरा बृहद सिंचन योजनेवर सुमारे ३ हजार ८६६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यात मोहनपुरा धरणावर सुमारे ४४० कोटी खर्च आहे. त्याचे काम डिसेंबर २०१४ मध्ये सुरू झाले होत. धरणास १७ दारे आहेत. त्यामुळे किमान १.३५ लाख हेक्टर शेतीचे सिंचन होऊ शकते. राजगड हा मध्य प्रदेशातील दुष्काळग्रस्त भाग म्हणून आेळखला जातो. धरणामुळे सुमारे ७२५ गावांना त्याचा सिंचनासाठी लाभ होईल.  सोबतच ४०० गावांना पिण्याचे पाणीही मिळेल. 

बातम्या आणखी आहेत...