आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या की हत्याकांड? रजिस्टरवर लिहिले होते.. शरीर नश्वर आहे.. देवाला भेटायला जाऊ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बुराडी परिसरात रविवारी पहाटे 11 जणांचे मृतदेह आढळले होते. त्यापैकी 10 जण फासावर लटकले होते. त्यांच्या तोंडावर आणि डोळ्यावर टेप लावलेले होता. तर हात बांधलेले होते. तर एका 75 वर्षीय महिलेचा मृतदेह दुसऱ्या खोलीत जमीनीवर पडलेला होता. मृतांमध्ये दोन भावांची कुटुंबे त्यांची आई, बहीण आणि भाचीचा समावेश आहे. या घटनेशी संबंधित अनेक आश्चर्यकारक अशा बाबी आता हळू हळू समोर येत आहेत. 

 

असा घडला असावा प्रकार..

>> हा प्रकार नियोजनबद्ध रित्या घडल्याचा संशही पोलिसांना आहे. सुरुवातीला जेवणात बेशुद्ध करण्याचे औषध मिसळण्यात आले. त्यानंतर एक किंवा काही लोक वगळता सर्व बेशुद्ध झाले. त्यानंतर सर्वांचे हात, तोंड बांधले. डोळ्यावर पट्ट्या लावल्या. शुद्धीत आल्यानंतर कोणी विरोध करू नये म्हणून असे करण्यात आले. 

>> हा प्रकार करत असताना 58 वर्षीय महिलेला शुद्ध आली. त्यामुळे त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यानंतर एकेकाला ओढणीच्या सहाय्याने फाशी देण्यात आली. 
>> घरात एक कुत्राही होता. पण घटनेपूर्वी त्याला छतावर नेऊन बांधण्यात आले. हा सर्व प्रकार पाहून कुत्रा भुंकू नये म्हणून ही खबरदारी घेतली असल्याची शक्यता आहे. 

 

यामुळे आहे आत्महत्येचा संशय..
>> पोलिसांनी रविवारी हे प्रकरण सामुहिक हत्याकांड असण्याची शक्यता व्यक्त केली. पण घरात मिळालेल्या पुराव्यांवरून हा सामुहिक आत्महत्येचा प्रकार असावा असा संशय येत आहे. 
>> घरातून सापडलेल्या एका रजिस्टरवर काही धार्मिक मजकूर लिहिण्यात आलेला होता. अर्धे भरलेले असलेल्या या रजिस्टरवर डिसेंबरपासून लिहिण्यास सुरुवात करण्यात आली होती. 
>> 26 जूनला या रजिस्टरची चार पाने भरण्यात आली. त्यात 30 जूनला देवाला भेटण्यासाठी जाण्याचा उल्लेखही करण्यात आला होता. 
>> या रजिस्टरमध्ये लिहिले होते, शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे. यात असेही लिहिले होते की, कोणालाही हात आणि तोंड बांधून आपल्या भितीवर विजय मिळवता येऊ शकतो. यात निर्वाणाचा उल्लेखही करण्यात आला आहे. 
>> पोलिसांना रजिस्टरवर लिहिलेल्या मजकुरावरून असा संशय आहे की, हे कुटुंब काही तरी संशयास्पद धार्मिक विधी करत असावे. त्यामुळे पोलिस काळ्या जादू किंवा तंत्र मंत्रच्या अँगलने याचा शोध घेत आहेत. 


यांचा झाला मृत्यू 
भूपी सिंह भाटिया (45), त्यांची पत्नी श्वेता (42), मुलगी नीतू (24), मुलगी मीनू (22) मुलगा ध्रुव (15), भूपीचा भाऊ ललित (42) त्यांची पत्नी टीना (38), ललितचा मुलगा शिवम (12), भूपीची आई नारायण देवी (75), भूपीची बहीण प्रतिभा (58), प्रतिभाची मुलगी प्रियंका (30). 

 

 

बातम्या आणखी आहेत...