आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहित प्रियकराने सांगितले प्रेयसीच्या हत्येमागील सत्य, म्हणाला- पैसे नव्हते पुरत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यमुनानगर- बिंदू हत्याकांड प्रकरणामागिल खुलासा पोलिसांनी केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी बिंदूचा प्रियकर पोपीनला अटक केली आहे. तो आपल्या पत्नीला भेटण्यासाठी आला होता. चौकशी अधिकारी बलबीर सिंह यांनी सांगितले की, आरोपी मजूरीचे काम करतो. आठ ते दहा हजार रुपयांत दोन कुटुंब चालवणे अवघड होते.  त्यामुळे त्याने बिंदूचा पत्ता कट करण्याचे ठरवले आणि तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला सोमवारी कोर्टात हजर केले, तेथून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.


स्वत: अविवाहीत असल्याचे सांगून प्रेयसीला मिळवून दिली खोली...
- पोलिस अधिरारी बलबीर सिंह यांनी सांगितले की, पोपीनने चौकशीत सांगितले की, बिंदू दुकान चालवत होती. तेथे त्याचे येणे- जाणे होत होते.
- यामुळे दोघांमध्ये मैत्री झाली. त्याने बिंदूला आपण अविवाहीत असल्याचे सांगितले. त्यानंतर काही दिवस गेल्यानंतर दोघांनी एकमेकांसोबत लग्न करणाण्याची इच्छा व्यक्त केली.
- पोलिसांनी सांगितले की, अदाजे चार महिन्यांपूर्वी पोपीनने बिंदू आणि तिच्या मुलांना एक खोली किरायाने दिली. तिथे त्याने घरमालकाला सांगितले की, ते दोघे पती-पत्नी आहेत.


यमुनेच्या किनाऱ्यावर नेवून दिला धक्का...
- पोलिसांनुसार, पोपीनची इनकम कमी होती. तेवढ्यात पत्नी आणि प्रेयसी असे दोन कुटुंब चालवणे अवघड होत होते.
- बिंदू सतत त्याच्याकडे खर्चासाठी पैसे मागत होती. अनेकवेळा यावरून त्याच्यात भांडण देखील होत होते.
- 7 डिसेंबरला त्याने बिंदूला 600 रुपायांचे घरसामान खरेदी करून दिले आणि आपल्या पत्नीकडे निघाला. रस्त्यात त्याचा बिंदूला मार्गातून हटवण्याची कल्पना सुचली.
- तो परत आला आणि बिंदूला फिरण्याच्या बहान्याने नदिच्या किनाऱ्यावर घेऊन गेला. सोबत तिची पाच वर्षाची मुलगी देखील होती. 
- दरम्यान, त्याने बिंदूसोबत मारहाण करण्यास सुरूवात केली आणि तिला धक्का देऊन नदीत लोटून दिले.
- हे पाहून बिंदूची पाच वर्षाची मुलगी पळून घरी पोहोचली आणि संपूर्ण घटनेविषयी सांगितले.
- आठ दिवसांनंतर 15 डिसेंबरला बिंदूचा मृतदेह नदितून काढण्यात आला होता, तेव्हा पोलिसांनी हत्येचा केस दाखल केली होती.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...