आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पनून काश्मीर संघटनेकडून अमेरिकेच्या निर्णयाची प्रशंसा; दहशतवादी संघटनांवर पाक ठाेस कारवाई करत नाहीच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू - दहशतवादी संघटनांसह दहशतवाद्यांना पैसा पुरवत असल्याने अमेरिकेने पाकला दिली जाणारी मदत राेखण्याचा निर्णय नुकताच घेतला. तसेच पाकचा दहशतवाद्यांना अाश्रय देणाऱ्या देशांच्या यादीत समावेश करण्याचाही निर्णय घेतला. अमेरिकेच्या या निर्णयांची पनून काश्मीर संघटनेने साेमवारी प्रशंसा करत हा निर्णय दिलासादायक असल्याचे म्हटले अाहे.  


अार्थिक कृती दलाच्या (एफएटीएफ) जागतिक समितीने दहशतवादी संघटनांना सातत्याने पुरवल्या जाणाऱ्या पैशांसह मनी लाँडरिंगमुळे पाकचा गत शुक्रवारी लक्ष ठेवले जावे, अशा देशांच्या यादीत समावेश केला. तसेच अमेरिकेने याच कारणामुळे पाकला देण्यात येणारी १.१५ काेटी डाॅलर्सची मदत राेखण्याचा निर्णय घेतला हाेता. अमेरिकेचा हा निर्णय समाधानकारक असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अश्विनीकुमार चृंगू यांनी सांगितले. पॅरिस व पेंटाॅगाॅन हल्ल्यांत पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे अाढळून अाल्याने अमेरिकेने ही कारवाई केली. पाक दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याचे नाटक करताे; ठाेस कारवाई मात्र करत नाही. त्यामुळे पाकबाबत अमेरिकेने घेतलेला निर्णय याेग्यच अाहे, असेही अश्विनीकुमार यांनी सांगितले. पनून काश्मीर ही विस्थापित झालेल्या काश्मिरी हिंदूंची संघटना असून त्यांच्या प्रश्नांसाठी काम करते.   

‘कारवाँ-ए- अमन’ बससेवेद्वारे अाठवड्याला १५ जण करतात सीमापार प्रवास 
 ‘कारवाँ-ए-अमन’ बससेवेद्वारे दर अाठवड्याला किमान १५ जण सीमा पार करत अाहेत. ही बससेवा श्रीनगर ते मुझफ्फराबाददरम्यान चालवण्यात येते.  या साप्ताहिक बससेवेच्या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीरमधून दाेन जण भारतात त्यांच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी अाले. ते १९४७ च्या भारत-पाक फाळणीत वेगळे झाले हाेते व सात काश्मिरींनी नियंत्रणरेषा पार केली. तसेच इतर सहा जण अापल्या मूळ गावी परतले अाहेत. ते सर्व जण उरी भागातील कमान तपासणी नाका परिसरात राहत हाेते, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...