आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिंपचे प्रवीण तोगडिया आले शुद्धीत, अहमदाबादेत उपचार सुरू; दुपारी घेणार पत्रकार परिषद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया सोमवारी पहाटेपासून अचानक बेपत्ता झाले होते. तब्बल १२ तासांनी ते एका बागेमध्ये बेशुद्धावस्थेत अाढळले. त्यांच्यावर अहमदाबादेतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  थोड्याच वेळात तोगडिया पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. 


सकाळी १० वाजेनंतर तोगडिया बेपत्ता झाल्याचा दावा करत विहिंपने राज्यात निदर्शने केली. तोगडियांवर राजस्थानच्या गंगापूर शहरातील एका प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. ते घेऊन पोलिस सकाळी त्यांच्या घरी गेले. तेव्हापासून ते बेपत्ता होते. त्यांना अटक केली नसल्याचा खुलासा पोलिसांनी केला होता.

 

३६ जवानांच्या झेड प्लस सुरक्षेनंतरही बेपत्ता कसे?
तोगडिया यांना झेड प्लस श्रेणीतील सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे. त्यांच्यासोबत २४ तास ३६ जवान तैनात राहतात. तरीही ताेगडिया बेपत्ता कसे झाले, हा प्रश्न आहे. 

बातम्या आणखी आहेत...