आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 18व्या वर्षापासून असे घेताहेत प्रायश्चित्त, काट्यांचा बिछाना पाहून सर्वच होतात हैराण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद (यूपी) - संगमनगरीत एक महिना चालणाऱ्या माघ यात्रेत वेगवेगळ्या रीतीचे अनेक साधू-सन्यासी आणि भाविक गंगास्नानासाठी येत आहेत. काही पुण्य कमवण्यासाठी, तर काही पापांचे क्षालन करण्यासाठी येतात. काट्यांच्या बिछान्यावर झोपलेले बाबा पाहून प्रत्येकाला घाम फुटतो. काट्यांवर झोपण्याची सिद्धी प्राप्त झालेल्या रामा बाबांना आता लोक काट्यांवाले बाबा म्हणून ओळखू लागले आहेत.  

 

18 वर्षे वयापासून घेत आहेत प्रायश्चित...
- आग्राचे रहिवासी बाबा लक्ष्मण राम (52) म्हणाले, ''18 वर्षे वयात माझ्याकडून चुकून गोहत्या झाली होती, यानंतर मी या प्रकारे प्रायश्चित्त घेण्याचा प्रयत्न करत आहे.''
- ''वेदना होता, पण सहन करतो. माघ आणि कुंभामध्ये नेहमी येथे येतो. लोग जे अर्पण करतात, ते मथुरेत गायींच्या देखभालीसाठी वापरतो. यातूनच भंडाराही चालवतो.''
- ''या वेळी 6 दिवसआधी आलो आहे. मौनी अमावास्येवर अक्षयवट मार्गावर पहिल्या दिवशी काट्यांच्या बिछान्यावर झोपलो आहे.''
- ''देशात जेथेही मोठे धार्मिक आयोजन होते, तेथे मुख्य दिवशी न चुकता जातो.''

 

बाबाला पाहून थबकतात भक्तांची पावले...
- प्रत्यक्षदर्शी रमेश म्हणाले, ''मौनी अमावास्येवर स्नान करण्यासाठी संगमात कुटुंबासोबत आलो आहे. यात्रेत एक बाबा काट्यांच्या बिछान्यावर झोपलेले पाहून हैराण झालो.''
- दुसरीकडे, कुटुंबासह पूजा करण्यासाठी आलेल्या सुषमा म्हणाल्या, ''मी दरवर्षी माघ मासात येते. या वेळीही आले. बाबाला काट्यांवर झोपलेले पाहून नजर हटतच नव्हती.''

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...