आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटण्यात अपहरण करून 9 वीच्या विद्यार्थ्याची हत्या; 25 लाख खंडणीची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- बिहारमधील पाटणा येथे डोक्यावर झालेले तीन लाखांचे कर्ज फेडण्यासाठी विक्रांत ऊर्फ विकी पासवान नावाच्या तरुणाने इयत्ता नववीत शिकणाऱ्या रौनककुमार या विद्यार्थ्याची हत्या केली. रौनकच्या वडिलांकडे त्याने २५ लाखांची खंडणी मागितली होती. १७ जानेवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास शाळेत जाण्याच्या वेळेत विकी (रा. नीमतल, कुम्हरार) याने प्रापर्टी डीलर सुधीरकुमार यांचा लहान मुलगा रौनक याला गोड बोलून दुचाकीवर बसवले.  रौनकला त्याने संदलपूर येथील स्वत:च्या शुभम शंृगार व गिफ्ट कॉर्नर या दुकानात नेले. तेथून त्याने रौनकचे वडील सुधीर यांना सकाळी साडेनऊ वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत वारंवार फोन करून खंडणी मागितली. यादरम्यान त्याने मुलास मारहाण केली.  
 
रौनक याच्या तोंडात प्लास्टिकचा बोळा कोंबून सेलो टेपने त्याचे तोंड बंद केले. नंतर मफलर अथवा दोरखंडाने त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर विकी दुकान बंद करून फरार झाला. विकी रौनकला आधीपासूनच ओळखत होता. पोलिसांनी तातडीने  तपासाची चक्रे फिरवून सीसीटीव्हीच्या फुटेजच्या अाधारे आरोपी विकीला अटक केली.
बातम्या आणखी आहेत...