आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उघड्यावर शौच केल्यास मोफत तांदूळ नाही: पुद्दुचेरी राज्यपाल किरण बेदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुद्दुचेरी - पुद्दुचेरीच्या राज्यपाल किरण बेदी यांनी घाण पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर पाऊल उचलले आहे. त्याला या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी आणि अद्रमुकने विरोध केला आहे. उपराज्यपाल शनिवारी म्हणाल्या, ‘ गावात उघड्यावर शौच किंवा कचरा फेकल्यास या क्षेत्रात मोफत तांदूळ योजनेतील तांदळाचे वितरण केले जाणार नाही.’


बेदी म्हणाल्या, जी गावे हागणदारीमुक्त झाली आहेत तेथे उघड्यावर कचरा आणि प्लास्टिक फेकले जात नाही तेथे स्थानिक आमदार आणि पुरवठा विभागाच्या आयुक्तांच्या प्रमाणपत्रानंतरच मोफत तांदळाचे वाटप केले जाईल. 

बातम्या आणखी आहेत...