आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेड्डी बंधूंनी 35 कोटींची चोरी केली; पण भाजपने तिकीट दिले, राहुल गांधींची टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कालगी-  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी तीन प्रचारसभा घेतल्या. उत्तर कर्नाटकच्या लिंगायतबहुल कालगीमध्ये राहुल यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या तत्त्वज्ञानाचे उदाहरण देताना पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. राहुल म्हणाले, मोदी बसवेश्वरांच्या मूर्तीसमोर खोटे बोलतात. मोदी आंबेडकरांविषयी बोलतात; परंतु देशभरात त्यांचे लोक दलितांवर अन्याय करत आहेत.

 

ते भ्रष्टाचाराबद्दल बोलतात. मग कर्नाटकात येतात. तेव्हा सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री येदियुरप्पा हे त्यांच्या शेजारी उभे दिसतात. रेड्डी बंधूंनी ३५ हजार कोटी रुपयांची चोरी केली. मात्र भाजपने त्यांना तिकीट दिले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने खाण घोटाळ्यातील आरोपी जनार्दन रेड्डी यांना बेल्लारीत जाण्याची परवानगी नाकारली आहे.   

 

बातम्या आणखी आहेत...