आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी भाजपसाठी शुभ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा टोला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - राहुल गांधी भारतीय जनता पक्षासाठी शुभ आहेत. कारण काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून भाजपने पाच राज्यांत विजय संपादन केला आहे,  असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.   


भाजपने त्रिपुरा, नागालँड, मेघालयात चांगली कामगिरी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आदित्यनाथ यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. गुजरातच्या निवडणुकीपूर्वी गांधी यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली होती. गांधी भाजपसाठी शुभ असतील, असे आम्ही यापूर्वीच म्हटले होते. ते उपाध्यक्ष असताना भाजपने दहा राज्यांतील विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. आता ते काँग्रेसचे अध्यक्ष बनले आहेत. आता पाच राज्यांत भगवा ध्वज फडकला आहे.  
तीन राज्यांतील भाजपच्या चांगल्या कामगिरीवर आदित्यनाथ यांनी समाधान व्यक्त केले.

 

आता बंगाल, आेडिशा, केरळ तसेच कर्नाटकमध्येही विजय संपादन केला जाईल. चारही राज्यांत निवडणूक होईल. तेथेही भाजप विजयी होईल आणि सरकार स्थापन करेल. २०१९ च्या निवडणुकीत विजय संपादन करून भाजप पुन्हा मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

 

‘श्री श्रींसोबतच्या बैठकीचा राजकीय अर्थ काढू नका’  
वादग्रस्त रामजन्मभूमीच्या प्रश्नी श्री श्री रविशंकर यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली होती. त्या बैठकीचा राजकीय अर्थ काढला जाऊ नये. तो शिष्टाचाराचा भाग होता, असे आदित्यनाथ यांनी एका प्रश्नावर स्पष्ट केले.  

 

बातम्या आणखी आहेत...