आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने एक विधानसभा, दाेन लोकसभेच्या जागा गमावल्या; राजस्थानात काँग्रेसचा विजय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- राजस्थानात दोन लोकसभा आणि एक विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवून भाजपला धक्का दिला. विजयामुळे काँग्रेसचे लाेकसभेतील संख्याबळ ४६ वरून ४८ तर भाजपचे २७७ वरून २७५ झाले आहे. अलवरमध्ये काँग्रेसचे कर्णसिंह यादव यांनी भाजप उमेदवार जसवंत यादव यांना दीड लाखाहून अधिक मतांनी हरवले. जसवंत सध्या वसुंधरा राजे मंत्रिमडळात मंत्री आहेत. अजमेरमध्ये काँग्रेसचे रघू शर्मा यांनी भाजपचे रामस्वरूप यांचा, तर मांडलगड विधानसभेत काँग्रेसचे विवेक धाकड यांनी भाजपचे शक्तीसिंह हाडा यांचा १३ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. सावरलाल जाट यांच्या निधनामुळे अजमेर, खा. महंत चांदनाथ यांच्या निधनामुळे अलवर व आमदार कीर्तिकुमारी यांच्या निधनामुळे मांडलगड जागा रिक्त झाल्या होत्या. ९ महिन्यांनी राजस्थानात विधानसभा निवडणूक होत आहे.


विजयाचे श्रेय पायलटांना

या जागांवर काँग्रेसने सचिन पायलट यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. निकालानंतर पायलट यांनी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

 

बंगालमध्ये तृणमूलच
प. बंगालमध्ये उलुबेरिया लोकसभा, नवपाडा विधानसभा पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला. सजदा यांनी ४ लाखांवर तर, नवपाडामध्ये सुनील सिंह यांनी ६३ हजारांहून अधिक मतांनी ही जागा जिंकली. या जागांवर भाजप दुसऱ्या स्थानी राहिला.

 

पुढील स्लाइडवर पाहा, काँग्रेसच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष...

बातम्या आणखी आहेत...