आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ByPoll: राजस्थान विधानसभेच्या एका जागेवर काँग्रेस विजयी, लोकसभेच्या 2 जागांवर आघाडीवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर/ कोलकाता - नुकत्याच झालेल्या  पोट निवडणुकीत राजस्थानमधील मंडलगड मतदारसंघात काँग्रेस उमेदवार विवेक धाकड, तर पश्चिम बंगालमधील नवपाडा विधानसभेच्या जागेवर तृणमूल काँग्रेस विजय झाली आहे. राजस्थानमधील अलवर आणि अजमेर या दोन्ही लोकसभेच्या जागांवरही काँग्रेस आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमधील उलबेरिया लोकसभा मतदारसंघात टीएमसी पुढे आहे. 

 

कोण कुठे जिंकले? 
- नवपाडा (पश्चिम बंगाल) विधानसभा मतदारसंघ : तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) सुनिल सिंह 1 लाख 11 हजार 729 मतांनी विजयी झाले आहेत. ही जागा काँग्रेस आमदार मधुसूदन घोष यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती. 
- मंडलगड (राजस्थान) विधानसभा मतदारसंघ : येथे काँग्रेसचे विवेक धाकड 12 हजार 976 मतांनी विजयी झाले. ही जागा भाजप आमदार कीर्ति कुमार यांच्या निधनानंतर रिक्त झाली होती. 

- अलवर (राजस्थान) लोकसभा मतदारसंघ : ही जागा भाजपच्या ताब्यातून काँग्रेस खेचून आणताना दिसत आहे. येथे काँग्रेसचे उमेदवार 72 हजार पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. 

उलबेरिया (पश्चिम बंगाल) लोकसभा मतदारसंघ : येथे टीएमसी उमेदवार आघाडीवर आहे. 

 

किती टक्के झाले मतदान?
जागा मतदान %
अजमेर (राजस्थान) 65%
अलवर (राजस्थान) 62%
मंडलगड (राजस्थान) 80%
उलूबेरिया (पश्चिम बंगाल) 76%
नवपाडा (पश्चिम बंगाल) 75%
बातम्या आणखी आहेत...