आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कावेरी वादावरून तामिळनाडूत आंदोलन; चेन्नई सुपरकिंग्जने काळ्या फिती बांधून खेळावे: रजनीकांत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- कावेरी मॅनेजमेंट बोर्ड (सीएमबी) स्थापन करण्याच्या मागणीसाठी तामिळनाडूमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. रविवारी या आंदोलनाला तामिळ फिल्म इंडस्ट्रीने पाठींबा दर्शवला. या दिरंगाईचा मौन पाळून निषेध केला. सुपरस्टार रजनिकांत आणि कमल हसनसह अनेक अभिनेते यामध्ये सहभागी झाले होते. सर्वोच्च न्यायलयाने 29 मार्चला केंद्राला बोर्ड स्थापनद करण्‍याचे आदेश दिले होते, परंतु अद्याप याच्यावर कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही.

 

चेन्नई सुपर किंग्जने काळ्या फिती बांधून खेळावे...
रजनीकांत यांनी केंद्र सरकारला इशारा देताना म्हटले आहे की, जोपर्यंत केंद्र तामिळ जनतेची मागणी मान्य करत नाही, तोपर्यंत त्यांना विरोधाचा सामना करावा लागेल. तसेच, आयपील सामन्या दरम्यान चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके)ने देखील विरोध दर्शवण्यासाठी काळ्या फिती बांधून खेळायला हवे असे रजनीकांत यांनी म्हटले आहे. 


बोर्डचे गठन नाही झाले तर, विरोध सुरूच राहिल....
- माध्यमातील वृत्तांनुसार, रजनीकांतने वल्लुवर कोट्टमच्या प्रदर्शनात जाण्यापूर्वी म्हटले की, कावेरी मुद्द्यावर विरोध होत असताना राज्यात जर आयपीएलचा एखादा सामाना होणार असेल, तर चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंनी जनतेसोबत यावे आणि काळ्या फिती बांधून केंद्र सरकारचा विरोध करावा.
- रजनीकांत पुढे बोलताना म्हणाले की, जोपर्यंत सरकार बोर्ड गठीत करणार नाही, तोपर्यंत त्यांना तामिळनाडूच्या जनतेच्या विरोधाला समोरे जावे लागले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बोर्ड गठीत करण्याची मर्यादा 29 मार्चलाच संपली आहे, आता यात आणखी उशीर करणे योग्य नाही

बातम्या आणखी आहेत...