आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३२ काेटी रुपये न दिल्याने लावला बलात्काराचा अाराेप : दाती महाराजांचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- शिष्येवर बलात्कार केल्याचा अाराेप झालेले शनिधाम संस्थेचे संस्थापक दाती महाराजांनी बुधवारी दावा केला की, ३२ काेटी रुपये न दिल्याने काही लाेकांनी त्यांच्यावर खाेटे अाराेप लावले. सचिन जैन, अभिषेक अग्रवाल व नवीन गुप्ता या तीन जणांनी माझ्याविराेधात षड‌्यंत्र रचले अाहे. अाराेप करणारी तरुणी व तिचे वडीलही या षड‌्यंत्रात सहभागी अाहेत. त्यामुळे या सर्वांच्या काॅल डिटेल्सची तपासणी केली जावी, अशी मागणी दाती महाराजांनी केली. सचिनने मला उद्ध्वस्त करून टाकण्याची धमकी दिली हाेती व अाराेप करणारी तरुणीशी तर दाेन-अडीच वर्षांपासून माझा काेणताही संपर्क नाही, असा दावादेखील दाती महाराजांनी या वेळी केला. 

दरम्यान, दाती महाराजांच्या तिन्ही भावांची दिल्ली पाेलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारीही चाैकशी केली. त्यात त्यांना शंभराहून अधिक प्रश्न विचारले; परंतु अनेक प्रश्नांची उत्तरे ते देऊ शकले नाहीत. 


१० वर्षांपासून साेबत हाेता सचिन; पुढील सुनावणी २५ जूनला 
दाती महाराज म्हणाले की, अभिषेकने माझ्या नावावर काही जणांशी देण्या-घेण्याचा व्यवहार केला हाेता. अाता नवीन गुप्ता व सचिन जैन हे माझ्याकडून ३२ काेटी रुपये मागत अाहेत. सचिन गत दहा वर्षांपासून माझ्यासाेबत हाेता व पैशांसाठी त्याने मला गुडगावमध्ये बाउन्सर्ससाेबत घेरून उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली हाेती. दरम्यान, या प्रकरणातील पीडितेने गुरुवारी दिल्लीच्या साकेतमधील न्यायालयात अर्ज देऊन या प्रकरणाचा अहवाल मिळण्याची मागणी केली. याप्रकरणी पुढील सुनावणी २५ जूनला हाेणार अाहे. 


रुग्णालय व अाश्रमातील पार्किंगची जागा मागितली 
मी गत १२-१३ वर्षांपासून मुलींसाठी रुग्णालयाची निर्मिती करत अाहे. मात्र, या लाेकांनी माझ्याकडून रुग्णालय मागितले. यासह शनिधाममधील पार्किंगची जागाही मागितली. यासाेबतच अनेक वेळा मला धमक्याही देण्यात अाल्या. मी काेणताही गुन्हा केला असेल, तर मला फासावर चढवा; परंतु महिलांचा हा विषय मुद्दा बनवू नका. मी शेकडाे मुलींचे पालनपाेषण केले अाहे, असेही दाती महाराजांनी सांगितले. 


इतर तिघांचीही चाैकशी; महिला अायाेगाची भेट 
दरम्यान, याप्रकरणी दाती महाराजांसह अाराेपी बनवण्यात अालेले अर्जुन, अनिल व अशाेक यांची चाैकशी सुरू हाेती. दुसरीकडे राजस्थान राज्य महिला अायाेगाच्या तीनसदस्यीय पथकाने अालावास येथील गुरुकुलमध्ये जाऊन विविध दस्तएेवज जमा केले. त्यात अनेक गैरव्यवहार झाले असल्याचे अाढळून अाले अाहे, असे पथकाच्या सदस्या सुषमा कुमावत यांनी सांगितले. 


पळपुटा नाही; घटनेचा सन्मान करताे 
दाती महाराज म्हणाले की, मी राज्यघटनेचा सन्मान करताे; मी पळपुटा नाही. गरज पडेल तेव्हा तपासात सहकार्य करीन. अाश्रमात येणाऱ्या व जाणाऱ्या मुलींकडून प्रथम शपथपत्र भरण्यात येते व पाेलिसांना त्याची माहिती देण्यात अाली अाहे. दरम्यान, दिल्ली महिला अायाेगाने गुन्हे शाखेच्या पाेलिस उपायुक्तांना समन्स बजावून दाती महाराजांना अटक न करण्याचे कारण विचारले अाहे. 

बातम्या आणखी आहेत...