आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करोडपती नाहीत, लखपती आहेत योगी; कार आणि शस्त्रास्त्रांचा आहे छंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकल डेस्क - 19 मार्च म्हणजेच सोमवारी योगी सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. मॅथ्समधून ग्रॅज्युएट योगी आदित्यनाथ यांनी भलेही आपली मेन स्ट्रीम बदलली असेल, परंतु राजकारणाच्या बेरीज-वजाबाकीत त्यांना तोड नाही. यानिमित्त DivyaMarathi.Com आपल्या वाचकांना योगींशी निगडित काही बाबी सांगत आहे. 

 

स्वत:ची ना जमीन आहे, ना एखादे घर... 
- योगी आदित्यनाथ हे महंत आहेत. त्यांच्याकडे ना स्वत:ची जमीन आहे, ना एखादे घर.
- तरीही त्यांना कारचा मोठा छंद आहे.
- एका माहितीनुसार, 2004 मध्ये त्यांच्याकडे एक क्वालिस, एक टाटा सफारी आणि एक मारुति एस्टीम होती.
- 2009 मध्ये त्यांनी आपली कार बदलली. एस्टीम आणि क्वालिसला हटवून गॅरेजमध्ये एक नवी सफारी आणि एक फोर्ड आयकॉनला सामील करण्यात आले.

 

लखपती आहेत योगी 
- 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारी अर्जात योगी यांनी 72 लाखांची संपत्ती दाखवली होती.
- अॅफिडेव्हिटमध्ये 3 लाखांची टाटा सफारी, 21 लाखांची टोयोटा फॉर्च्यूनर आणि 12 लाखांची इनोव्हा सामील होती.
- 1998 पासून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती.
- तरीही ते आजपर्यंत कोट्यधीशांच्या कॅटेगरीत आलेले नाहीत.

 

शस्त्रास्त्रांचा आहे छंद 
- कारशिवाय योगी यांना शस्त्रास्त्रांचाही छंद आहे.
- 2004 मध्ये त्यांच्याकडे फक्त 30 हजार रुपयांची शस्त्रास्त्रे होती.
- 2009 मध्ये त्यांनी जुनी हटवून 1 लाख 80 हजारांची नवी रिव्हॉल्व्हर आणि रायफल खरेदी केली.
- 2004 मध्ये त्यांच्याकडे एूकण 9 लाख 60 हजारांची प्रॉपर्टी होती.
- तेव्हा त्यांच्याकडे एक 10 हजार रुपयांची रिव्हॉल्व्हर आणि 20 हजार रुपयांची रायफल होती.
- 2009 लोकसभा निवडणुकीपर्यंत योगींवर 1 मर्डर आणि 1 अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल झाला होता. 
- तोपर्यंत त्यांच्याकडे 21 लाख 82 हजारांची संपत्ती होती.
- जी 2014 मध्ये वाढून 71 लाख 97 हजार झाली आहे.

 

सोन्याची चेन घालणे पसंत
- योगींकडे अष्टधातूचे कुंडल आहेत. 
- याशिवाय त्यांना सोन्याची चेन घालणे पसंत आहे.
- 2009 पासून ही दोन्ही आभूषणे त्यांच्याकडे आहेत.

 

26 च्या वयात बनले होते खासदार...
- फक्त 26 वर्षे वयात योगींनी पहिली लोकसभा निवडणूक लढली होती.
- गोरखपुरातून निवडणूक लढल्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.
- 12व्या लोकसभेत निवड झालेले योगी सर्वात तरुण खासदार होते.
- योगी 1999, 2004, 2009 आणि 2014 मध्ये गोरखपूरमधून खासदार म्हणून निवडले गेले.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे आणखी काही फोटोज...