आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘तुतिकोरिन’ प्रकरणातील याचिकेवर तत्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने दिला नकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई -   तुतिकोरिन येथील गोळीबारात १३ जणांच्या मृत्यूप्रकरणातील याचिकेवर तत्काळ सुनावणी करण्यास शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. आता याप्रकरणात सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान  द्रमुकसह विरोधकांच्या राज्यव्यापी बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. विरोधी पक्षनेते एम. के. स्टॅलिन, पक्षाच्या राज्यसभा सदस्य कनिमोझी यांच्यासह काही कार्यकर्त्यांना शुक्रवारी पोलिसांनी     अटक केली होती. 


 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती  ए.एम. खानविलकर व न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या पिठाने या प्रकरणाचा उल्लेख सोमवारी पुन्हा न्यायालयासमोर करण्यास सांगितले. वकील जी.एस. मणि यांनी याचिकेवर लवकर सुनावणीची विनंती केली होती. हिंसाचाराची सीबीआय मार्फत चौकशीचे आदेश द्यावे, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी २५ लाख रुपये  देण्यासाठी आदेश द्यावेत, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे.

 

दुसरीकडे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी पदाचा राजीनामा द्यावा तोपर्यंत आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका स्टॅलिन यांनी घेतली आहे. मदुरांतकम येथील निदर्शनादरम्यान स्टॅलिन यांना अटक झाली. या भागात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तमिळनाडूत द्रमुकच्या सहकारी पक्षांनी देखील ठिकठिकाणी आंदोलन केले. द्रमुकच्या नेतृत्वाखालील बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले.  त्यावरून राज्यात राजकारण तापू लागले आहे. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...