आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गँगरेप पीडित माय-लेकीवर प्रश्नांची सरबत्ती, 6 RJD नेत्यांवर पीडितेची ओळख सार्वजनिक केल्याचा गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
13 वर्षांची मुलगी आणि तिच्या 43  वर्षांच्या आईवर बिहारमध्ये गॅंगरेप झाला. - Divya Marathi
13 वर्षांची मुलगी आणि तिच्या 43 वर्षांच्या आईवर बिहारमध्ये गॅंगरेप झाला.

पाटणा - बिहारमधील गया येथे सामूहिक अत्याचाराची शिकार झालेल्या माय-लेकीच्या भेटीसाठी गेलेल्या आरजेडी नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेची ओळख सार्वजनिक केल्याच्या त्यांच्यावर आरोप आहे, त्यासोबतच पीडितेवर झालेल्या अत्याचाराची आपबिती विचारण्यासाठी त्यांनी दबाव टाकल्याचाही आरोप आहे. दरम्यान 13 वर्षीय पीडितेने गुंडांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही असे म्हटले आहे. 

 

आरजेडी नेत्यांच्या प्रश्नांनी पीडिता वैतागली...
- आरजेडी नेते शुक्रवारी गँगरेप पीडित आई-मुलीच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी पीडितेला तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाविषयी वारंवार विचारणा केली. वेगवेगळे प्रश्न विचारुन पीडित महिला आणि तिच्या मुलीला वैतागून सोडले. 
- यावेळी आरजेडी कार्यकर्त्यांनी केलेली गर्दी आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात केलेल्या घोषणाबाजीमुळे गोंधळ उडाला. यावेळी पीडितेच्या चेहऱ्यावरील स्कार्फ निसटला.
- आरजेडी नेते आणि कार्यकर्त्यांच्या गोंधळाने वैतागलेली पीडिता म्हणाली, की एकच गोष्ट मी वारंवार सर्वांना कशी सांगू? मला काहीही सांगाचे नाही आणि काहीही बोलायचे नाही. मला माझ्या घरी जाऊ द्या. मी ते दुर्दैवी प्रकरण परतपरत कशी सांगू?

 

केव्हा घडली घटना.. 
- आई आणि मुलीवर बलात्काराची घटना 13 जूनच्या रात्री घडली आहे. गया येथील सोनडीहा गावात एक डॉक्टर, त्यांची पत्नी आणि मुलगी यांना 12 शस्त्रधारी लोकांनी ओलिस ठेवले होते. 
- गुंडांनी डॉक्टरला झाडाला बांधून त्याची 45 वर्षीय पत्नी आणि 13 वर्षांच्या मुलीवर सामुहिक अत्याचार केला. त्यानंतर त्यांची बाइकही पळवून नेली. 

 

पीडितेची मागणी - त्या गुंडांना फासावर लटकवा.. 
- पीडितेने दुष्कर्माच्या आरोपींना फासावर लटकवण्याची मागणी केली आहे. ती म्हणाली, 'त्या नराधमांना फाशी होईल तेव्हाच मला न्याय मिळेल. जे काही माझ्यासोबत घडले ते कोणासोबतही घडू नये, त्यासाठी त्या गुंडांना फाशी झाली पाहिजे. माझी एकच मागणी आहे, की त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी.'
- पीडिता म्हणाली, 'आमच्याकडे जे काही होते ते सर्व आम्ही त्यांना दिले होते. त्यानंतरही त्या नराधमांनी आमच्यावर अत्याचार केले.'

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, पीडितेचा व्हिडिओ... 

 

बातम्या आणखी आहेत...