आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Accident बस-डंपरच्या धडकेत 8 ठार, कुणाचे हात पाय तुटले तर कुणाचे शीर धडावेगळे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बसची अशी अवस्था झाली. - Divya Marathi
बसची अशी अवस्था झाली.

अजमेर (राजस्थान) - रविवारी सकाळी सुमारे 10 वाजता अजमेरच्या जवळ बस आणि टिप्परचा भीषण अपघात झाला. त्यात एका चिमुरडीसह 8 जण ठार झाले तर 20 जखमी आहेत. जखमींपैकी 2 गंभीर आहेत. शॉर्टकटसाठी टिप्पर राँग साइडने येत होता. त्याचवेळी समोरून बस वेगात येत होती. अचानक समोरून आलेला टिप्पर थेट बसमध्ये घुसला. एका साईडने बस अक्षरश: कापली गेली. या दुर्घटनेत अनेक मृतदेह आणि जखमी प्रवासी रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेले होते. कोणाचे शीर धडावेगळे झालेले होते, तर काहींचे हात-पाय तुटून पडलेले होते. 


सगळीकडे आरडा-ओरडा सुरू 
अपघातानंतर आरडा ओरडा ऐकून सर्वात आधी जवळचे गावकरी मदतीसाठी पोहोचले. खासगी वाहनांनी जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यात आले. नंतर अॅम्ब्युलन्स आणि इतर मदत मिळाली. मृतांमध्ये बस कंडक्टरचाही समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने मृताच्या वारसांना 50-50 हजार रुपये आणि जखमींना 10-10 हजारांची मदत जाहीर केली आहे. 


बसमधील तरुणाने सांगितली आँखो देखी.. 
जयपूरच्या नरेंद्र कुमार यांनी 'दैनिक भास्कर'ला सांगितले की, मी कुटुंबाला भेटायला जयपूरला जात होतो. मी पालीहून बसलो होतो. पाली ते ब्यावरपर्यंत ड्रायव्हर वेगात गाडी चालवत होता. ब्यावरला अनेक लोक उतरले त्यामुळे बस रिकामी झाली. लोक आपल्या आवडीनुसार दुसऱ्या जागांवर बसू लागले. मीही आधी मध्यभागी बसलो होतो. पण नंतर ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बसलो. पण काहीवेळाने उन्हामुळे पुन्हा उठून मागे बसलो. बस पुन्हा वेगात धावत होती. 120 ची गती होती. तबीजीजवळ मला एक टिप्पर समोरून येताना दिसला. तो राँगसाईड आणि बसकडे येतोय हे समजण्याच्या आतच एक मोठा धमाका झाला आणि सगळे काही सुन्न झाले. काही समजायच्या आत हायवेवर मृतदेह आणि जखमी पडलेले होते. 


लोक आरडा ओरडा करत होते. मदतीची मागणी करत होते. माझ्या डोक्यालाही मोठी जखम झाली होती. पण मी शुद्धीत होतो. जे होतंय ते सर्व पाहत होतो. लोक आले आणि मदत करू लागले. एकाने माझे डोके पकडले आणि कापड बांधून मला अॅम्ब्युलन्सपर्यंत नेले. असे दृश्य कधीही पाहिले नव्हते, असेही नरेंद्र यांनी सांगितले. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...