आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sensory Center For Women In Police Station; Facility Of Sanitary Pad Vending Machine

बिलासपूरच्या पोलिस ठाण्यात महिलांसाठी संवेदना केंद्र; सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीनचीही सुविधा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिलासपूर- छत्तीसगडच्या बिलासपूरच्या ठाण्यात महिला संवेदन केंद्र उघडले जात आहे. ठाण्यात तक्रार करण्यासाठी येणाऱ्या महिला किंवा पीडित महिलांची गैरसोय होऊ नये हा त्याचा उद्देश आहे. संवेदना केंद्रात महिलांसाठी खाण्यापिण्याची, थांबण्याची वेगळी व्यवस्था असेल. केंद्रात डॉक्टरही असतील. संवेदना केंद्र सुरू होत असलेला बिलासपूर हा देशातील पहिला जिल्हा आहे.

 

सध्या ते तोरवा ठाण्यात सुरू केले आहे. जिल्ह्याच्या १९ आणि इतर जिल्ह्यांतही ते सुरू करण्याची योजना आहे. उपमहानिरीक्षक दीपांशू कोबरा यांनी या केंद्रांसाठी पुढाकार घेतला आहे. दीपांशू म्हणाले की, ‘ठाण्यात येणाऱ्या महिला, विशेषत: अत्याचार पीडितांना खूप समस्या येतात. पुरुष कर्मचाऱ्यांसमोर त्यांना अनेक प्रश्न विचारले जातात. खाण्याची-थांबण्याचीही व्यवस्था नसते. आता ही समस्या दूर होईल.’ संवेदना केंद्रात महिलांना सल्ला देण्यासाठी ठाणे स्तरावर एक समितीही आहे. सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन ५ रुपयाचे नाणे टाकल्यावर पॅड देईल. त्याच्या डिस्पोजलसाठीही एक यंत्र आहे. महिला पोलिस कर्मचारीही केंद्राचा वापर करू शकतील. 


बिलासपूरचे पोलिस अधीक्षक आरिफ शेख यांनी सांगितले की, असे केंद्र स्थापण्याचा विचार ४ वर्षांपूर्वी आला होता. सरकारने महिला कर्मचाऱ्यांसाठी वेगळ्या खोलीसाठी निधी दिला. त्यामुळे पीडित महिलांसाठी संवेदना केंद्र बनवण्यासाठी तो वापरला. याआधी ठाण्यात महिला डेस्कही स्थापन झाला आहे.

> संवेदना केंद्रात महिला. (इन्सेट) केंद्रात लावलेले सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा फोटो....

 

बातम्या आणखी आहेत...