आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Servant Took Revenge Of Beating By Owner By Helping Thieves Steal Gold Worth 80lakhs

पगारवाढ मागणाऱ्याला मालकाची मारहाण, बदल्यासाठी मित्रांच्या मदतीने चोरले 80 लाखांचे सोने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- 3 किलो 400 ग्रॅम सोन्याची चोरी झाली. पण पोलिसांना फक्त 1 किलो सोने जप्त करता आले. 

- नोकराने चोरीचा कट रचला. त्यात एक सोने व्यावसायिकाचाही समावेश होता. 


वाराणसी - एका कर्मजचाऱ्यानै मालकाकडे पगार वाढवण्याची विनंती केली. पण मालकाने थेट त्याची धुलाई केली. त्यामुळे नाराज झालेल्या कर्मचाऱ्याने मित्रांच्या मदतीने स्कूटरमधील 80 लाखांचे सोने चोरी केले. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली. संदीप नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. चौकशीत संदीपने सांगितले की, ज्यादिवशी  दुकानाचा मालक गोपाल सेठचा भाऊ हरिशंकर आणि त्याचा मुलगा रवीने त्याला मारहाण केली होती, त्याच दिवशी त्याने बदला घेण्याचे ठरवले होते. एसएसपी आनंद कुलकर्णी यांनी सांगितले की, रेशम कटरा परिसरात 3 किलो 400 ग्रॅम सोन्याची चोरी संदीपनेच सहकाऱ्यांच्या मदतीने केली. तोच घटनेचा मास्टरमाइंड आहे. संदीपने चोरीसाठी त्याचे मित्र सागर, बृजेश आणि मुकेशचा समावेश केला. मुकेशचे दागिन्यांचे दुकान गोपाल सेठच्या दुकानासमोर आहे. पोलिसांच्या मते, आपल्या प्रतिस्पर्ध्याला संपवण्यासाठी तो या कटात सहभागी झाला. 


कटात आठ जणांचा समावेश 
संदीपने पोलिसांना सांगितले की, 6 जुलैला मुकेश आणि सागरला तो घरी घेऊन गेला. त्याठिकाणी त्यांची रूपेश आणि बृजेशबरोबर भेट झाली. त्याने त्यांना बनावट किल्ली दिली. 7 जुलैला गोपाल सेठ सकाळी 5.30 वाजता दुकानात पोहोचले. सोने त्यांच्या गाडीच्या डिक्कीत होते. गोलाप स्कुटर बाहेर उभी करून दुकानाची स्वच्छता करण्यासाठी आत गेला. त्याचवेळी संधी साधून बृजेशने डिक्कीतील संपूर्ण सोने काढले. गल्लीच्या बाहेर गेल्यानंतर त्याने सोन्याने भरलेली पिशवी रुपेशला दिली. रूपेश इतर सहकाऱ्यांबरोबर कोणी ओळखू नये म्हणून हेल्मेट परिधान करून उभा होता. पोलिसांनी संदीप, सागर, मुकेश आणि बृजेशला अटक केली आहे. त्यांच्याकडून एक किलो सोने जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी मुकेशच्या पत्नीसह चार आणखी आरोपी असून ते फरार आहेत. 

 

 

बातम्या आणखी आहेत...