आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैंगिक शाेषण प्रकरण : शिक्षेच्या २ महिन्यांनंतरही अपील करण्यास अासारामची टाळाटाळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाेधपूर- अल्पवयीन मुलीचे लैंगिक शाेषण केल्याप्रकरणी दाेषी ठरवलेल्या अासारामला कनिष्ठ न्यायालयाने अाजीवन कारावासाची शिक्षा सुनावली अाहे. त्यानुसार त्याला शिक्षा ठाेठावून दाेन महिन्यांचा कालावधी उलटला अाहे; परंतु अद्यापही अासारामकडून कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात अाव्हान देण्यात अालेले नाही. कारण काेणत्याही निर्णयाविराेधात अपील करण्याची मुदत दाेन महिन्यांची असते. तथापि, उच्च न्यायालयाला सुट्या असल्याने त्यास लिमिटेशन अॅक्ट व उच्च न्यायालयाच्या नियमांतर्गत अपील करण्यास विलंब झाल्याप्रकरणी दिलासा मिळू शकताे; परंतु हा दिलासा मिळवण्यासाठी त्याला सुट्या संपल्यावर येत्या २ जुलैपर्यंत अपील दाखल करावे लागेल. 


या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कनिष्ठ न्यायालयापासून सर्वाेच्च न्यायालयापर्यंत जामिनासाठी १२ वेळा विनंती करणारा अासाराम अपील दाखल करण्याबाबत अत्यंत सावधगिरीने पावले टाकत असल्याचे दिसून येत अाहे. तथापि, या प्रकरणातील सहअाराेपी, शिक्षा मिळालेली संचिता ऊर्फ शिल्पीकडून अपील दाखल करण्यात अाले अाहे. याप्रकरणी अासारामला गत २५ एप्रिल राेजी एससी-एसटी न्यायालयाचे तत्कालीन पीठासीन अधिकारी मधुसूदन शर्मा यांनी अाजीवन कारावासाची शिक्षा ठाेठावली हाेती. याशिवाय इतर अाराेपी शिल्पी व शरदचंद्र यांना २०-२० वर्षांची शिक्षा सुनावली हाेती. 


२ जुलैला दाखल केले जाऊ शकते अपील

तसे पाहता अपील दाखल करण्याची मुदत दाेन महिन्यांची असते; परंतु लिमिटेशन अॅक्ट व उच्च न्यायालयाच्या नियमांनुसार न्यायालयाच्या उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने सुट्या संपल्यानंतर अपील दाखल केले जाऊ शकते. मात्र, ते सुट्या संपताच पहिल्या दिवशी दाखल केले, तरच मान्य केले जाईल. त्यानंतर विलंब झाल्यास त्याचे याेग्य कारण न्यायालयात सांगता येऊ शकेल; परंतु ते मान्य करायचे की अमान्य? हे न्यायालयावर अवलंबून असेल. अासारामच्या अपील याचिकेवर भादंवि कलम ३७४नुसार न्यायालयात सुनावणी हाेईल. कारण त्याला अाजीवन कारावासाची शिक्षा झालेली अाहे व अशा प्रकरणांतील अपिलावर उच्च न्यायालयाचे खंडपीठच सुनावणी करते. 


अपेक्षेपेक्षा जास्त मिळाली शिक्षा 
अासारामला एवढ्या शिक्षेची अपेक्षा नव्हती. इतकी माेठी शिक्षा झाल्याने त्यास या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात अाले. त्यामुळे उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळण्यासाठी ताे अत्यंत सावधगिरी बाळगत अाहे. याशिवाय त्याने याप्रकरणी उच्च न्यायालयाची काय भूमिका अाहे? हे जाणून घेण्यासाठी स्वत:कडून अपील दाखल करण्याएेवजी सहअाराेपी शिल्पीकडून दाखल केले. याबाबतचा खुलासा अासारामच्या व्हायरल झालेल्या अाॅडिअाेतूनही झाला हाेता. 


काेणताही धाेका न पत्करण्याच्या मन:स्थितीत 
अासाराम सध्या उच्च न्यायालयात शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी विनंतीपत्र व अपील दाखल करून दिलासा मिळवण्याच्या मन:स्थितीत अाहे. त्यामुळे ताे काेणताही धाेका पत्करण्यास तयार नाही. याच कारणामुळे त्याने अपिलाचा मसुदा तयार करण्यासाठी दिल्लीच्या नामांकित वकिलांची मदत घेतली अाहे. जाेधपूरच्या वकिलांकडूनही मसुदा तयार केला व नंतर ताे दिल्लीला पाठवला. सूत्रांनुसार चंदिगडचे नामांकित वकील एस.के.मीणा यांचीही अपील तयार करण्यासाठी मदत घेण्यात अाली असून, सर्वाेच्च न्यायालयाच्या काही वकिलांशीही याबाबत सल्लामसलत केली अाहे. 

बातम्या आणखी आहेत...