आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धरामय्या सरकार दडपशाही करणारे, त्यांना हटवा; अमित शहा यांचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलबुर्गी- कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकार ‘भ्रष्ट, द्वेष करणारे तसेच दडपशाही करणारे’ आहे, असा आरोप भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी केला. आगामी निवडणुकीत या सरकारला सत्तेतून हटवा, असे आवाहन त्यांनी राज्यातील नागरिकांना केले.


अमित शहा यांनी येथे अनुसूचित जाती-जमातीच्या संमेलनाला हजेरी लावली. सिद्धरामय्या सरकार कर्नाटकच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे, असा आरोप करून शहा म्हणाले की, मुख्यमंत्री महाग घड्याळ घालतात आणि ते कोणीतरी आपल्याला ‘भेट’ दिले असे सांगतात. एका सर्वेक्षणाचा हवाला देऊन शहा म्हणाले की, कर्नाटकमधील कायदा-सुव्यवस्था परिस्थिती अत्यंत वाईट आहे. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी राज्यात अनुसूचित जाती-जमातींवरील अत्याचाराच्या ८०० प्रकरणांची नोंद झाली आहे. यावरून राज्यात अनुसूचित जाती-जमातीचे लोक आणि इतर कमकुवत घटक सुरक्षित नाहीत, हे स्पष्ट होते, असा आरोपही शहा यांनी केला.

 

कर्नाटकात काँग्रेसची सत्ता कायम राहील : राहुल
कर्नाटकात विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे सरकार सत्तेत कायम राहील, असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी व्यक्त केला. बेळगावी जिल्ह्यातील गोडाची येथे ‘जन आशीर्वाद यात्रे’दरम्यान एका सभेला संबोधित करताना राहुल म्हणाले की, सुशासनामुळे आम्ही राज्यात पुन्हा सत्तेत परत येऊ. केंद्रातील रालोआ सरकार आपली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप राहुल यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...