आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सिंगापूर - सिंगापूरचे पंतप्रधान ली सेन लूंग सोमवारी त्यांचे 4 मंत्री आणि 40 हजार भक्तांसह 164 वर्षे जुन्या मंदिराच्या जीर्णोद्धार समारोहासाठी पोहोचले. या मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी जवळपास 23 कोटी रुपये खर्च झाले. सिंगापूरमधील लिटील इंडिया नावाने प्रसिद्ध एरियामध्ये श्री श्रीनिवास पेरुमल हे मंदिर आहे. येथे 'महा सम्प्रक्षाणम' नावाने अभिषेक करण्यात आला. यानंतर 45 दिवस येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याला मंडलाबिशेगम म्हटले जाते.
पंतप्रधानांनी ट्विट करुन दिली मंदिर पूर्ण झाल्याची माहिती
- पंतप्रधान ली सेन यांनी अदल्या रात्री ट्विट करुन सांगितले, की 164 वर्षे जुने मंदिर खुले होत आहे. त्याच्या पुनर्निर्माणाचे कार्य पूर्ण झाले आहे. गेल्या दीड वर्षांपासून हे कार्य सुरु होते. आता अभिषेकासाठी मंदिर पूर्णपणे तयार आहे. येथे दर 12 वर्षांनी मंदिराची दुरुस्ती केली जाते.
सिंगापूरचे पंतप्रधान प्रथमच मंदिरात
- सिंगापूर येथील स्ट्रेट टाइम्स वृत्तपत्राने म्हटले आहे, की हिंदू कॅलेंडर नुसार हा सर्वात मोठा सण असतो. 2004 मध्ये पंतप्रधान झालेले ली सेन हे प्रथमच एखाद्या मंदिरात दर्शनासाठी गेले आहेत.
- यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळातील 4 मंत्री त्यांच्यासोबत होते.
अभिषेकासाठी लंडनहून सिंगापूरला पोहोचले ली सेन
- मंदिरात दर्शन आणि अभिषेकासाठी पंतप्रधान लंडनहून आले होते. त्यांच्यासोबत असलेले उद्योगमंत्री एस.ईश्वरन म्हणाले, 'पंतप्रधान थेट लंडन येथील कॉमनवेल्थ मिटींग अटोपून येथे पोहोचले.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.