आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिपुरा: तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले सहा आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आगरतळा -  त्रिपुरात २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत खातेही उघडू न शकलेल्या भाजपकडे आता ६ आमदार आहेत. तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या ६ आमदारांना विधानसभा अध्यक्ष रमेंद्रचंद्र देबनाथ यांनी भाजपचे आमदार म्हणून मान्यता दिली.  सुदीपरॉय बर्मन, आशिषकुमार साहा, दिबाचंद्र हरंगखवाल, बिस्वबंधू सेन, प्रांजितसिंह रॉय व दिलीप सरकार यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीत विजय मिळवला होता. मात्र ते २०१६ मध्ये तृणमूलमध्ये सामील झाले होते. पुन्हा तृणमूलचे नेते व कार्यकर्त्यांसह याच वर्षी ७ ऑगस्टला भाजपमध्ये प्रवेश केला होता. 
बातम्या आणखी आहेत...