Home | National | Other State | Snake Charmer Sewing Cobra Mouth From Needle Thread Live Video

सुई-दोऱ्याने शिवत होता तोंड- चिडलेल्या सापाने घेतला असा बदला, दोघेही एकत्रच दफन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 09, 2018, 10:57 AM IST

मृत्यूच्या जबड्यात हात घालणाऱ्याच्या आयुष्याचा भरवसा नसतो. बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात रविवारी झालेल्या घटनेने ही गोष्

 • Snake Charmer Sewing Cobra Mouth From Needle Thread Live Video
  भोलाने एका हाताने सापाची मान पूर्ण ताकदीने पकडली होती. दुसऱ्या हाताने तो सापाचे तोंड शिवू लागला होता.

  समस्तीपूर - मृत्यूच्या जबड्यात हात घालणाऱ्याच्या आयुष्याचा भरवसा नसतो. बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात रविवारी झालेल्या घटनेने ही गोष्ट सिद्ध केली आहे. साप पकडून त्याचा खेळ दाखवणाऱ्याला सापानेच दंश केला. झाडपाल्याच्या वापराने त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु त्यात यश आले नाही. त्याचा मृत्यू झाला.

  पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज व मृत्यूचा लाईव्ह व्हिडिओ...

  सुई-दोऱ्याने शिवत होता सापाचे तोंड...
  - घटना समस्तीपूर जिल्ह्याच्या ताजपूरची आहे. भोला सहनी हा मोतीपूर गावात आपल्या सासुरवाडीत राहत होता. तो ऑटो चालवण्यासोबतच सापही पकडत होता. भोला सापाचा खेळ दाखवायचा, ज्यामुळे त्याची वरकमाई व्हायची.
  - सध्या थंडीचा एवढा कहर आहे की, माणसांबरोबरच सापही गारठून त्रस्त झाले आहेत. रविवारी दुपारी ऊन पडलं तेव्हा एक कोबरा साप ताजपूर पेट्रोल पंपाजवळ उघड्यावर ऊन शेकत पहुडला होता.
  - उघड्यावर सापाला पाहून गावातील लोक जमा झाले. थंडीमुळे साप लगेच रिअॅक्ट करू शकला नाही. तो लोकांपासून वाचण्याच्या प्रयत्नात इकडेतिकडे जात राहिला. परंतु, कुठे जाईल त्याआधीच तेथे भोला सहनी पोहोचला आणि त्याने सापाला पकडले.
  - भोलाने एका हाताने सापाची मान पूर्ण ताकदीने पकडली आणि दुसऱ्या हाताने सापाचे तोंड सुई-धाग्याने शिवू लागला. तोंडत सुई टोचल्याने साप तडफड करू लागला होता, पण भोला त्याला सोडायला तयार नव्हता.
  - डझनभर लोक हा तमाशा पाहत उभे होते. लोक भोलाला विचारत होते की, तू सापाचे तोंड का शिवत आहेस? भोलाने उत्तर दिले होते की, त्याचे तोंड शिवून घरी घेऊन जाईन आणि माझ्याकडील जडीबुटीच्या वासाने त्याला काबू करीन.
  - भोला सापाचे तोंड शिवत होता, तेवढ्यात काही काळासाठी सापावरून त्याची पकड सैल झाली. तेवढ्याच काळात सापाने भोलाला जहरी दंश करून बदला घेतला.
  - तो सापाला आपल्यासोबत घरी घेऊन गेला. पण घरी पोहोचेपर्यंत त्याची हालत जास्तच बिघडली, शेवटी कोबराच तो. कुटुंबीयांनी आधी झाडपाल्याचा इलाज करण्याचा प्रयत्न केला, पण काहीच फायदा झाला नाही. प्रकृती चिंताजनक होत असल्याचे पाहून भोलाला मुजफ्फरपूरला नेण्यात येऊ लागले, परंतु रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

  एकत्रच दफन केले दोघांना...
  - भोलाच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी त्या सापालाही ठार केले. भोलाच्या मृतदेहाजवळ सापाचा मृतदेह ठेवण्यात आला. त्याच्या घरात आणखी एक नाग होता. भोलाचा मुलगाही साप पकडतो. तो घरात ठेवलेल्या दुसऱ्या नागाला घेऊन आला.
  - गावकरी मृतदेहाजवळ गोळा झाले होते. दुसऱ्या नागालाही भोलाच्या मृतदेहाजवळ ठेवण्यात आले. सापाने दंश केल्यानंतर काही वेळानेच भोलाचा मृत्यू झाला होता, तरीही खूप वेळापर्यंत दुसऱ्या नागाला त्रास देण्यात आला.
  - गावातील काही लोकही त्याला जिवे मारू इच्छित होते, परंतु त्या नागाच्या फणीवर त्रिशुळासारखे चिन्ह होते. हे पाहून लोक म्हणू लागले की, हा भगवान शंकराचा साप आहे, याला मारले जाऊ शकत नाही.
  - गावाच्या स्मशानात भोलाच्या मृतदेहाला दफन करण्यात आले. भोलाच्या मृतदेहाजवळच त्या कोबरालाही जमिनीत दफन करण्यात आले.

  पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज व मृत्यूचा लाईव्ह व्हिडिओ...

 • Snake Charmer Sewing Cobra Mouth From Needle Thread Live Video

  भोलाच्या मृतदेहाजवळ जमलेले गावकरी.

  शेवटच्या स्लाइडवर पाहा, घटनेचा व्हिडिओ...

 • Snake Charmer Sewing Cobra Mouth From Needle Thread Live Video

  कोबराच्या दंशाने भोलाचा काही वेळातच मृत्यू झाला होता, तरीही खूप वेळपर्यंत लोकांनी सापाला त्रास दिला.

 • Snake Charmer Sewing Cobra Mouth From Needle Thread Live Video

  भोलाचा मुलगाही साप पकडतो, त्याने घरातला दुसरा नागही बाहेर आणला.

 • Snake Charmer Sewing Cobra Mouth From Needle Thread Live Video

  भोलाच्या मृत्यूनंतर लोकांनी दंश केलेल्या कोबरालाही हाल-हाल करून ठार केले.

 • Snake Charmer Sewing Cobra Mouth From Needle Thread Live Video

  दुसऱ्या नागाच्या फणीवर त्रिशुळाचे चिन्ह होते म्हणून लोकांनी त्याला भगवान शंकराची खूण समजून जिवंत सोडून दिले.

Trending