आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, 4 ठार; छत्तीसगडमधील बासागुडा येथील कॅम्पमधील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो - Divya Marathi
सांकेतिक फोटो

जगदलपूर- छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी सीआरपीएफच्या जवानाच्या अंदाधुंद गोळीबारात ४ जवानांचा मृत्यू झाला. एक गंभीर जखमी आहे. गोळीबार करणाऱ्या संतकुमार या जवानास ताब्यात घेतले आहे. सीआरपीएफचे पोलिस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी सांगितले, १६८ बटालियनचा गार्ड संतराम याने गोळीबार केला. यात फौजदार व्ही. के. शर्मा, मेघसिंह, सहायक फौजदार राजवीर आणि गार्ड जी. एस. राव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एक जवान गंभीर जखमी झाला आहे. हत्येच्या कारणांचा तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...