आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगा दहावीत नापास; कुटुंबाने काढली मिरवणूक; म्हणून काळजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेश - मध्य प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांचा निकाल साेमवारी जाहीर झाला. त्यात माेठ्या संख्येने विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले अाहेत. बुंदेलखंडमधील खजुराहाे येथे एका मुलाने परीक्षेत नापास झाल्याने अात्महत्या केल्याची घटना घडली. मात्र, सागर येथे एका कुटुंबाने मुलगा दहावीत नापास झाल्याने चक्क मिरवणूक काढून जल्लाेष साजरा केला. तसेच अातषबाजी करून मिठाईदेखील वाटली. 


सरस्वती शिशुमंदिरात (शिवाजी वाॅर्ड) शिकणारा इयत्ता दहावीचा विद्यार्थी अाशू व्यास हा सहापैकी ४ विषयांत नापास झाला. त्यावर नाराज वा संतप्त न हाेत्या अाशूचे वडील सुरेंद्रकुमार व्यास यांनी निकालाच्या दिवशीच संध्याकाळी परिसरातून अाशूची वाजतगाजत मिरवणूक काढली. परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे माझ्या मुलाने कुठलेही टाेकाचे वा चुकीचे पाऊल उचलू नये म्हणून असे करण्यात अाले, असे सुरेंद्रकुमार यांनी सांगितले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...